प्रदूषित हवेपासून बचाव करणारे ‘एअर प्युरिफायर’
सध्याच्या प्रदूषित वातावरणात प्रदूषणाचा त्रास होऊ नये यासाठी घरात एअर प्युरिफायरचा पर्याय निवडण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. पण एअर प्युरिफायर बाहेरील प्रदूषण संपवत नाही. तो घरातील हवेतून काही प्रदूषक कमी करतो. कार्बन मोनॉक्साइडसारखे वायू किंवा सर्व प्रकारचे रासायनिक वायू सामान्य HEPA फिल्टरने दूर होत नाहीत. हे देखील आपण विचारात घ्यायला हवे. घराबाहेर प्रदूषण जास्त असेल, घरात लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक असतील अथवा श्वसनविकार असलेली व्यक्ती असेल, तर एअर प्युरिफायरचा विचार करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, तो प्रदूषणमुक्त वातावरणाचा पर्याय नाही. तर प्रदूषण कमी करणे आणि घरातील हवेची गुणवत्ता सुधारणे हे दोन्ही महत्त्वाचे आहे याचाही विचार करायला हवा.
त्यातच वाढत्या हिवाळ्यात धुके, धुरके वाढते. त्याचबरोबर वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंधनामुळेही हवा प्रदूषित होते. परिणामी श्वसनाशी संबंधित आजार वाढतात. श्वसनाबरोबर धुळीचे कणही फुफ्फुसात प्रवेश करत रक्त प्रवाहात मिसळतात. ज्यामुळे दमा, अॅलर्जी किंवा इतर श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना अनेक गंभीर आजार होऊ शकतात. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या वयोगटातील व्यक्तींना प्रदूषणाचा त्रास अधिक होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या घरातील हवेची गुणवत्ता चांगली ठेवणे महत्त्वाचे आहे.अशावेळी योग्य प्युरिफायरमुळे तुम्ही घरात शुद्ध ताज्या आणि सुरक्षित हवेत मोकळा श्वास घेऊ शकतात. बाहेरून येणारी धूळ, धूर आणि काही हवेत तरंगणारे कण कमी करण्यासाठी एअर प्युरिफायर उपयोगी ठरतो.
एअर प्युरिफायर घेताना काय लक्षात ठेवावे?
फिल्टर- सूक्ष्म कणांसाठी खरा HEPA फिल्टर
खोलीचा आकार- खोलीच्या क्षेत्रफळाला अनुरूप CADR
देखभाल- फिल्टर बदलण्याचा खर्च आणि कालावधी
तंत्रज्ञान- ओझोन निर्माण करणारे प्युरिफायर टाळावेत
दरम्यान जर तुमच्याकडे एअर प्युरिफायर नसेल तर तुम्ही काय काळजी घ्यायला हवी ते बघूया.
1. बाहेरील AQI जास्त असताना खिडक्या बंद ठेवा.
2. स्वयंपाक करताना एक्झॉस्ट फॅन किंवा चिमणी वापरा.
3. घरात धूम्रपान टाळा आणि धूळ कमी ठेवण्यासाठी ओल्या कापडाने स्वच्छता करा.
4. बाहेर प्रदूषण जास्त असल्यास व्यायामासाठी मोकळी जागा निवडताना AQI तपासा.
Comments are closed.