हिटमॅन शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार! तीन वर्षांनंतर IPL 2027 मध्ये सांभाळणार संघाची धुरा

आयपीएल 2027 (Before Indian premier league 2027 Tournament) हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians Big announcement) मोठी घोषणा केली आहे. फ्रँचायझीने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा करत पुन्हा एकदा संघाची जबाबदारी सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माकडे (Rohit Sharma is Now Captain of Mumbai Indians) सोपवली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे आयपीएल 2027 मध्ये रोहित पुन्हा एकदा मुंबईचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

जवळपास तीन वर्षांनंतर रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे. यापूर्वी त्याने 2013 ते 2023 या काळात संघाचे नेतृत्व केले होते. आपल्या 11 वर्षांच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत त्याने मुंबईला 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. आता फ्रँचायझीने पुन्हा एकदा त्याच्याकडे संघाची धुरा सोपवली आहे.

मुंबई इंडियन्सने शुक्रवारी (27 नोव्हेंबर) आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक खास व्हिडिओ शेअर करत रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद सोपवल्याची घोषणा केली. या व्हिडिओमध्ये रोहित दिसत आहे. यासोबत फ्रँचायझीने ‘स्माईल, एव्हरीवन स्माईल’ म्हणजेच ‘हसा, सगळ्यांनी हसा’ असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे (Hardik pandya) संघाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. संघाला विजेतेपदही मिळवता आले नाही. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईला 2024 आणि 2026 या हंगामांत साखळी फेरीतूनच बाहेर पडावे लागले, तर 2025 मध्ये संघाला प्लेऑफपर्यंतच मजल मारता आली. तसेच, आयपीएल 2026 मध्ये मुंबईने 14 सामन्यांपैकी केवळ चार सामन्यांत विजय मिळवला. त्यामुळे हार्दिकच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणीही होत होती.

यानंतर अलीकडेच ट्रेड डीलच्या माध्यमातून हार्दिक पांड्या पंजाब किंग्स (Punjab kings) संघात सामील झाला असून त्याच्या जागी अर्शदीप सिंग (Arshdeep singh) मुंबई इंडियन्समध्ये आला आहे. त्यामुळे आता हार्दिकच्या जागी रोहित पुन्हा एकदा मुंबईचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

रोहित शर्मा 2011 पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. 2013 मध्ये त्याने रिकी पाँटिंगच्या (Ricky ponting) जागी संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात त्याने मुंबईला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या एकूण पाच हंगामांत विजेतेपद पटकावले.

रोहितने 2013 ते 2023 अशी 11 वर्षे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. आता आयपीएल 2027 मध्ये तो पुन्हा एकदा संघाची धुरा सांभाळणार आहे. रोहितच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा आपला जुना यशस्वी काळ अनुभवता येईल, अशी फ्रँचायझीला अपेक्षा आहे.

Comments are closed.