30 नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन
महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) संबंधित विधेयके पुन्हा मांडली जाऊ शकतात.
या विधेयकांमध्ये लोकसभेचे कमाल संख्याबळ सध्याच्या 550 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. 2029 च्या लोकसभा निवडणुकीपासून महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना 30 नोव्हेंबरपासून सभागृहाचे कामकाज सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे, तर राज्यसभेचे अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांना 2 डिसेंबरपासून सभागृहाचे कामकाज सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. कामकाजाच्या गरजेनुसार दोन्ही सभागृहांचे अधिवेशन 3 डिसेंबरपर्यंत संपण्याची शक्यता आहे.
एप्रिलचे विधेयक पुन्हा मांडले जाईल
महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक एप्रिलमध्ये लोकसभेत मांडण्यात आले. परंतु, आवश्यक दोन तृतीयांश बहुमत नसल्याने 17 एप्रिल रोजी हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. त्यावेळी उपस्थित 528 खासदारांपैकी 298 जणांनी विधेयकाच्या बाजूने तर 230 जणांनी विरोधात मतदान केले. आता आवश्यक बहुमत मिळविण्यासाठी सरकार पुन्हा प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा-
पठाणकोट सीमेवर पाकिस्तानी घुसखोर ठार
Comments are closed.