13 चौकार 20 षटकार, धोनीच्या जुन्या शिष्याने रचला इतिहास; झळकावले सर्वात वेगवान द्विशतक

एकीकडे भारतामध्ये विजय हजारे ट्रॉफीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तर दुसरीकडे 23 वर्षांखालील राज्य अ ट्रॉफीमध्ये समीर रिझवीने द्विशतक झळकावून मोठा धमाका केला आहे. काल शनिवार 21 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि त्रिपुरा यांच्यात सामना खेळला गेला. ज्यामध्ये यूपीने प्रथम खेळताना निर्धारित 50 षटकात 405 धावा केल्या. प्रत्युत्तरात त्रिपुराचा संघ केवळ 253 धावा करू शकला आणि 152 धावांच्या फरकाने सामना गमावला. त्रिपुरासाठी आनंद भौमिक हा एकमेव फलंदाज होता ज्याने 68 धावा केल्या.

या स्पर्धेत यूपीचा कर्णधार समीर रिझवीने केवळ 97 चेंडूत 201 धावांची नाबाद खेळी खेळली. ज्यामध्ये त्याने 13 चौकार आणि 20 षटकार मारले. समीर आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. लिस्ट-ए क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, सर्वात वेगवान द्विशतक झळकावण्याचा विक्रम सध्या न्यूझीलंडच्या चॅड बोव्सच्या नावावर आहे. ज्याने 103 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडच्या नावाचाही समावेश आहे. ज्याने 114 चेंडूत 200 धावांचा आकडा पार केला.

समीर रिझवीला आयपीएल 2023 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने 8.4 कोटी रुपयांना विकत घेतले. पण सीएसकेने त्याला 2024 मेगा लिलावापूर्वी सोडले होते. यावेळी लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला 95 लाख रुपयांना विकत घेतले. इंडियन प्रीमियर लीगमधून त्याच्या पगारात मोठी कपात झाली आहे. रिझवी सध्या जोरदार लयीत आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 153 धावांची तुफानी खेळी केली. याशिवाय अन्य एका सामन्यात 137 धावा करून तो नाबाद परतला. त्याचा फॉर्म कायम राहिल्यास तो आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.

हेही वाचा-

IND vs AUS; “ट्रेविस हेडला रोखणे कठीण…” भारताच्या माजी प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य
Vijay Hazare Trophy; दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ खेळाडूची तुफानी खेळी, ठोकल्या नाबाद 170 धावा
चॅम्पियन्स ट्राॅफीचे वेळापत्रक जाहीर! भारत कधी आणि कुठे खेळणार सामने?

Comments are closed.