Winter assembly session 2024 devendra fadnavis ajit pawar and eknath shinde cabinet expansion-ssa97


Cabinet Expansion : मंत्रिपद न मिळाल्यानं महायुतीचे अनेक आमदार नाराज झाले आहेत. ऐन अधिवेशनाच्या काळाता खातेवाटप झाल्यास आणखी नाराजू वाढू शकते.

महायुतीचं मंत्रिमंडळ विस्तार होऊन एक आठवड्याचा कालावधी लोटला आहे. हिवाळी अधिवेशन आज ( शनिवार, 21 डिसेंबर ) संपत असून खातेवाटप कुठे रखडलंय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. महायुतीच्या मंत्र्यांकडूनही आज-उद्या-आज-उद्या खातेवाटप होईल, असं सांगितलं जात आहे. यातच आजच खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात चर्चा होणार आहे. या तिघांच्या भेटीनंतर खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.

– Advertisement –

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर 21 डिसेंबर किंवा 22 डिसेंबरला मुख्यमंत्री खातेवाटपाचं पत्र राजभवनाचा पाठवतील. त्यानंतर 23 डिसेंबर मंत्री संभाव्य विभागाचा कार्यभार हाती घेतली. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटपातून नाराजांच्या प्रतिक्रियेला वेळ मिळणार नाही, असं सांगण्यात येत आहे.

मंत्रिपद न मिळाल्यानं महायुतीचे अनेक आमदार नाराज झाले आहेत. ऐन अधिवेशनाच्या काळाता खातेवाटप झाल्यास आणखी नाराजू वाढू शकते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध पवित्रा घेत अधिवेशानंतर खातेवाटप करणार असल्याचं बोललं जात आहे.



Source link

Comments are closed.