‘गुगल’मध्ये 10 टक्के नोकर कपातीची घोषणा

गुगलने कंपनीतील व्यवस्थापन पदांमध्ये 10 टक्के कपातीची घोषणा केली. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कंपनीच्या बैठकीत याबाबतची माहिती दिली. कंपनीच्या कार्यक्षम मोहिमेचा एक भाग म्हणून आणि आर्थिक आव्हांनाचा विचार करता हा कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला. 18 डिसेंबर रोजी झालेल्या गुगलच्या बैठकीत सुंदर पिचाई यांनी  व्यवस्थापक, संचालक आणि उपाध्यक्षपदाच्या कपातीचा तपशील दिला. काही पदे पूर्ण हटवण्यात आली तर काही वैयक्तिक योगदानकर्त्याच्या भूमिकेत रूपांतरित करण्यात आली, अशी माहिती गुगलच्या प्रवक्त्याने दिली. मागील दोन वर्षांमध्ये ही पुनर्रचना करण्यात आली. गुगलच्या समोर एआय स्पर्धकांची वाढती आव्हाने आहेत. विशेषतः एआय आधारित कंपनी ओपनएआयचे सर्च मार्केटमध्ये आव्हान आहे. या बैठकीत सुंदर पिचाई यांनी गुगलच्या कॉर्पोरेट संस्कृतीच्या योजनाबद्ध विकासाबद्दल भाष्य केले.

Comments are closed.