श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबई अपयशी, प्रतिस्पर्धी संघाने 383 धावांचे आव्हान गाठले
सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्राॅफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 21 डिसेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. ज्यामध्ये मुंबई संघाला पहिल्याच सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनलेल्या मुंबई संघाला विजय हजारे ट्रॉफीमध्ये खराब सुरुवातीचा सामना करावा लागला. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याच्या संघाने नकोसा विक्रमही केला. हा सामना कर्नाटक संघाविरुद्ध खेळवला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम बी ग्राऊंडवर हा सामना आयोजित करण्यात आला होता. जिथे मुंबईला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.
दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना 382 धावा केल्या. यादरम्यान श्रेयस अय्यरने शानदार शतक झळकावले. त्याने केवळ 55 चेंडूत 114 धावा केल्या. त्याच्या शतकामुळेच संघाला ही मोठी धावसंख्या गाठता आली. सामन्याच्या पहिल्या डावानंतर मुंबई संघ या धावसंख्येचा सहज बचाव करेल आणि सामना जिंकेल असे वाटत होते, परंतु कर्नाटकने हे लक्ष्य 46.2 षटकांत पार केले. यासह कर्नाटकने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 व्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रमही केला. विजय हजारे ट्राॅफी स्पर्धेच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा धावांचा पाठलाग होता.
या स्पर्धेत मुंबईचा संघ स्टार खेळाडूंनी सजला आहे. ज्यामध्ये श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे असे फलंदाज आहेत. गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर, अथर्व अंकोलेकर आणि तनुष कोटियन या नावांचा समावेश आहे. एवढं मोठं नाव असूनही कर्नाटकच्या एका खेळाडूने सारा खेळच उलथून टाकला. हा खेळाडू दुसरा कोणी नसून कृष्णन सृजित आहे. कृष्णन सृजितला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले आहे. कृष्णन सृजितने या सामन्यात 101 चेंडूत 150 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे कर्नाटकने हा सामना जिंकला. 2012 च्या स्पर्धेत गोव्याविरुद्ध 384 धावांचे लक्ष्य गाठून विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वोच्च लक्ष्याचा विक्रम आंध्रच्या नावावर आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग – 11
मुंबईचे प्लेईंग इलेव्हन: आंगकृष्ण रघुवंशी, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यकुमार यादव, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर, एम जुनैद खान.
कर्नाटकचे प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कर्णधार), अनिश केव्ही, निकिन जोस, स्मरण रविचंद्रन, अभिनव मनोहर, कृष्णन सृजित (यष्टीरक्षक), श्रेयस गोपाल, विजयकुमार वैश्यक, प्रवीण दुबे, वासुकी कौशिक, विद्याधर पाटील.
हेही वाचा-
IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का, सरावसत्रात केएल राहुल दुखापती
13 चौकार 20 षटकार, धोनीच्या जुन्या शिष्याने रचला इतिहास; झळकावले सर्वात वेगवान द्विशतक
अटक वॉरंटवर रॉबिन उथप्पाची पहिली प्रतिक्रिया, फसवणूक प्रकरणाबाबत मोठा खुलासा
Comments are closed.