चौथ्या कसोटीची वेळ बदलली; जाणून घ्या कधी, कुठे अन् किती वाजता पाहू शकता Ind vs Aus कसोटी सामना
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी थेट प्रवाह: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले गेले आहेत आणि आता चौथा कसोटी सामना गुरुवार 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून ओळखला जातो.
टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या मालिकेची सुरुवात दणदणीत विजयाने केली होती. मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने कांगारूंचा 295 धावांनी पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी 10 गडी राखून जिंकून मालिकेत बरोबरी केली. त्यानंतर तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. आता चौथ्या कसोटीत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना कधी, कोठे होणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवार, 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरू होणार आहे. सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार पहाटे 4.40 वाजता होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना कुठे आणि कसा बघता येईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर थेट पाहता येईल. याशिवाय मोबाईलवर सामना पाहणारे दर्शक डिस्ने हॉटस्टार ॲपवर ही कसोटी स्ट्रीम पाहू शकता. तुम्हाला या सामन्याशी संबंधित सर्व अपडेट्स abplive.com या एबीपी मराठी वेबसाइटवर मिळू शकतील.
मेलबर्न कसोटीत ‘या’ भारतीय खेळाडूंवर असणार लक्ष
मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत सर्वांच्या नजरा केएल राहुलवर असतील. बॉक्सिंग डे कसोटीत त्याने दोन शतके झळकावली आहेत. त्याने त्याच्या कसोटी करिअरची सुरूवातही बॉक्सिंग डे कसोटीने केली. याशिवाय विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.
चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.
हे ही वाचा –
अधिक पाहा..
Comments are closed.