चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अन् भारत दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा! कसोटी कर्णधाराला संघातून वगळलं

भारत दौरा आणि ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंड संघ : यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्ताकडे देण्यात आले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात संकरित मॉडेलमध्ये आयोजित केली जाणार आहे. मात्र, अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. पण इंग्लंडने आपला संघाची घोषणा केली आहे. याशिवाय भारत दौऱ्यासाठी इंग्लंडनेही आपला संघ जाहीर केला आहे. भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याने यांच्या संघाची घोषणा केली आहे. यासाठी संघात 15 खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्याला भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतही सहभागी व्हायचे आहे.

बेन स्टोक्सला मिळाली नाही संधी

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बेन स्टोक्सने 2023 चा वनडे वर्ल्ड कप खेळण्यासाठी निर्णय बदलला. त्यानंतर त्याने वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घेतला. तरीही त्याचा संघ विशेष काही करू शकला नाही. बेन स्टोक्सने पुन्हा निवृत्ती जाहीर केली नसली तरी दुखापतीमुळे त्याला भारत दौरा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात संधी देण्यात आलेली नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असेल, जिथे 22 जानेवारीपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत 5 सामने खेळवले जाणार आहेत. यानंतर, 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका देखील खेळली जाईल. या दोन मालिकांसाठी इंग्लंडच्या संघात फक्त एका खेळाडूचा फरक आहे. अनुभवी फलंदाज जो रूटचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे, तर लेगस्पिनर रेहान अहमदचा टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. तर अलीकडील मालिकेतील खराब कामगिरीमुळे विल जॅकला वगळण्यात आले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ : जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड.

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्सी, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड.

हे ही वाचा –

Ind vs Aus 4th Test : सिराजचा पत्ता कट? गिलवरतीही टांगती तलवार… चौथ्या कसोटीत टीम इंडियाचे बदलणार चित्र, जाणून घ्या भारताची प्लेइंग-11

अधिक पाहा..

Comments are closed.