हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीला झाले तरी काय? फोटो पाहून चाहते पडले चिंतेत

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी ती तिच्या घटस्फोटासाठी तर कधी तिचा एक्स पती ब्रॅड पिटसोबतच्या वादांमुळे तर कधी तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या लेटेस्ट लूकमुळे.

अँजेलिना जोली 49 वर्षांची जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. सौंदर्याबरोबरच तिचा फिटनेसही कमालीचा आहे. पण तिच्या अलीकडच्या फोटोंनी सोशल मीडियावर चाहते काळजीत पडले आहेत. तिचे फोटो पाहून तिची तब्येत बरी आहे ना याबाबत चाहत्यांना चिंता सतावत आहे. अँजेलिना जोलीने तिच्या ताज्या बायोपिक मारियामध्ये आपल्या शानदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर ती स्पॉट झाली आणि तेव्हाच चाहत्यांनी तिचा चेहरा आणि आणि हातावर फुगलेल्या नसा पाहून काळजीत पडले. काही लोकांचे म्हणणे आहे की, तिचा माजी पती ब्रॅड पिट याच्यासोबत सुरू असलेल्या घटस्फोटामुळे ती तणावपूर्ण अवस्थेतून जात आहे.

काहींनी याला अँजेलिना जोलीचा कठीण डाएट म्हणत आहेत. इतकेच नाही तर अँजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी लोक सोशल मीडियावर डाएट टिप्सही देत ​​आहेत. काही लोक तिला वाईट पद्धतीने ट्रोल करत आहेत आणि तिला व्हॅम्पायर बोलत आहेत. काही चाहते तिला तिचा आहार सुधारण्याचा सल्ला देत आहेत. अँजेलिना जोली गेल्या काही काळापासून तिचा पूर्वाश्रमीचा नवरा ब्रॅड पिटसोबत घटस्फोट घेतल्यामुळे चर्चेत आहे . आधी त्यांच्या घटस्फोटावरून आणि नंतर 500 मिलियन डॉलरच्या वाईनरीच्या हक्कावरून वाद न्यायालयात पोहोचला. 2016 मध्ये हे जोडपे वेगळे झाले, मात्र त्यांचा घटस्फोट अद्याप कोर्टात अडकला आहे.

Comments are closed.