Marine drive we cannot see buildings other side bombay high court angry maharashtra government mumbai pollution
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. हवा शुद्ध करण्यासाठी आम्ही देवावर अवलंबून नाही राहू शकत. त्याऐवजी अधिकाऱ्यांनी शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इच्छाशक्ती दाखवण्याची गरज असल्याचे मत न्यायालयाने मांडले आहे.
मुंबई : मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. हवा शुद्ध करण्यासाठी आम्ही देवावर अवलंबून नाही राहू शकत. त्याऐवजी अधिकाऱ्यांनी शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इच्छाशक्ती दाखवण्याची गरज असल्याचे मत न्यायालयाने मांडले आहे. (marine drive we cannot see buildings other side bombay high court angry maharashtra government mumbai pollution)
लाइव्ह लॉ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने शहरातील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेद्वारे काहीही उपाय केले जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. खराब हवेसंबंधी दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.
– Advertisement –
हेही वाचा – IAS Transfer : प्रशासनातही खांदेपालट; तब्बल 23 अधिकाऱ्यांच्या एका फटक्यात बदल्या
न्या. कुलकर्णी म्हणाले की, हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होते आहे. नागरिकांना सध्या गंभीर वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो आहे. आणि न्यायालय एखादा आदेश देते तेव्हाच अधिकारी काम करतात. खंडपीठाचे म्हणणे होते की, दिवाळीच्या आसपास प्रदूषण होण्यास सुरुवात झाली. आणि त्यात शहरातील बांधकाम, गर्दी अशा गोष्टींची भर पडते, आणि यामुळे हवा आणखी खराब होते.
– Advertisement –
न्या. कुलकर्णी म्हणाले की, हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. वाहतुकीचा थेट परिणाम हा वायू प्रदुषणावर होतो आहे. गाड्यांच्या धुरामुळे यात वाढच होते आहे. यामुळेच वाहतूक विभाग आणि प्रशासनाला एकमेकांच्या सहकार्याने काम करणे गरजेचे आहे. मात्र, अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यावर काहीही बोलू शकल्या नाहीत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांद्वारे होणाऱ्या प्रदूषणावर लक्ष ठेवायला हवे. बांधकाम सुरू असताना उडणाऱ्या धुळीवर लक्ष ठेवले पाहिजे. वाहतूक विभागाने वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणावर लक्ष ठेवले पाहिजे. थोडक्यात काय तर काही करण्याची इच्छाशक्ती असायला हवी.
हेही वाचा – Neelkamal Boat Accident : मुंबई बोट दुर्घटनेतील आणखी एक मृतदेह सापडला; मृतांचा आकडा 15 वर
Edited by : Ashwini A. Bhatavdekar
Comments are closed.