Congress leader patole accused bjp coalition government as there is no discussion on the issues of vidarbha, marathwada in the session


नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती पण भाजपा युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. (congress leader patole accused bjp coalition government as there is no discussion on the issues of vidarbha, marathwada in the session)

गडचिरोलीत विपुल खनिज संपत्ती आहे ती लाडका उद्योगपती लुटत आहे. धारावी प्रकल्प अदानीलाच देण्याचा निर्णय सरकारने केला आहे. थोडक्यात, या अधिवेशनातून सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. भाजपा युती सरकार हे गरीब, तरुण, शेतकऱ्यांचे नाही तर मूठभर श्रीमंताचे आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

– Advertisement –

हेही वाचा – Winter Assembly Session 2024 : अधिवेशनाचे सूप वाजले; आठवड्याभरात दोन्ही सभागृहात किती तास काम?

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी सरकारवर तोफ डागली. बीड आणि परभणीतील घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत, सरकारने गुंडगिरी पोसल्याचे परिणाम बीडमध्येही दिसले. पोलिसांमध्येही गुंडाराज आले आहे का? असा प्रश्न पडतो. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केले, त्यात अनेकांना जबर मारहाण केली, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांचा बचाव केला. परभणी प्रकरणात फक्त एका पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. निष्णात वकिलाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणात एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आपली खुर्ची वाचवण्यासाठी मित्रपक्षांच्या मंत्र्यांना घाबरतात असे दिसते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

– Advertisement –

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, सरकारने या अधिवेशनात मागील काळातीलच काही योजना सांगितल्या, विदर्भाच्या वाट्याला तर काहीही आले नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिघडलेली आहे. बीड प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड अजून फरार आहे, त्याला कोणाचा पाठिंबा आहे ते सर्वांना माहिती आहे. परभणी घटनेत पोलिसांच्या लाठीमारात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, तर कल्याणमध्ये मराठी माणसावर अन्याय करणारी घटना घडली. तरीही हे सरकार काहीह हालचाल करताना दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा – Ambadas Danve : नागपुरात अधिवेशन होऊनही विदर्भातील जनता मदतीपासून वंचित; दानवेंची टीका

पुरवणी मागण्या या फक्त खर्चासाठी होत्या विकासासाठी यात एका पैशाचीही तरतूद नाही. विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही सिंचन प्रकल्पावर मुख्यमंत्री बोलले पण त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. कांदा निर्यात मूल्य 20 टक्के हटवण्यावर निर्णय नाही. शेतकऱ्यासाठी काहीच नाही. अनुदानही दिले नाही. ईव्हीएम सरकारने जनतेला न्याय दिला नाही. विरोधी पक्ष म्हणून सरकारला अधिवेशनात जाब विचारला यापुढेही मजबुतीने सरकारला जाब विचारत राहू असेही अंबादास दानवे म्हणाले.

या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना आमदार सचिन अहिर, सुनील प्रभू आदी उपस्थित होते.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar



Source link

Comments are closed.