Chhagan Bhujbal on viral post of banner in Nashik asj
सिन्नर विधानसभेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून छगन भुजबळ यांचा फोटो गायब असल्याचे चर्चा
नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या छगन भुजबळ विरुद्ध अजित पवार असा राजकीय सामना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आहेत. अशातच नाशिकमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या स्वागतासाठी आणि अभिनंदानासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर छगन भुजबळ यांचा फोटो गायब असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. विशेष म्हणजे भुजबळांचे राजकीय विरोधक मानले जाणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचा फोटो होता. (Chhagan Bhujbal on viral post of banner in Nashik)
हेही वाचा : Bhujbal vs Ajit Pawar : अजित पवारांनी फसवणूक केली का? छगन भुजबळ म्हणाले…
– Advertisement –
या प्रकरणावर आमदार छगन भुजबळ यांना मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी ते म्हणाले की, “लाखो गरिबांच्या हृदयात आपला फोटो असणे ही बाब माझ्यासाठी पुरेशी आहे.” असे म्हणत त्यांनी उत्तर दिले. पण यानंतर त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “मला आधी दिल्लीत जायचे होते, तेव्हा सांगितले की राज्यात तुमची गरज आहे. राज्यात लढा, पण इथेही डावलेले गेले.” ते म्हणाले की, “लोकसभेनंतरही राज्यसभेच्या दोन जागांवर संधी होती. पण त्यावेळीही मला नकार दिला. राज्यात तुमची गरज आहे असे सांगितल्यानंतर आता गरज संपली का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
“मंत्रिमंडळात तरुणांना संधी देण्यासाठी आपल्याला थांबवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. पण तरुणपणाचे वय काय आहे? तरुणांना संधी द्या पण काही जागा ज्येष्ठ लोकांसाठी ठेवायला हव्यात ना. हे सगळे असेच होणार होते, मग आधीच सांगायचे ना विधानसभेला उभे राहू नका म्हणून.” असे म्हणत आमदार छगन भुजबळ यांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, ज्येष्ठ नेत्यांना केंद्रात संधी दिली जाणार असल्याचे विधान अजित पवारांनी केले होते. यावर विचारले असता ते म्हणाले की, “राज्यसभेवर जा म्हणणे म्हणजे विधानसभेचा राजीनामा देणे, मग विधानसभेला उभे केलेच कशाला?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Comments are closed.