CM Fadnavis ministery interfere in selection of private secretary pa and other staff for ministers asj
नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले आणि आता खातेवाटपही झाले. पण आता मंत्र्यांच्या खासगी सचिव, पीए तसेच विशेष कार्यकारी अधिकारी आणि स्टाफची नेमणुकीची लगबग सुरू झाली आहे.
मुंबई : महायुतीचे बहुमताचे सरकार राज्यात आले. त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले आणि आता खातेवाटपही पूर्ण झाले. त्यानंतर आता या मंत्र्यांच्या खासगी सचिव, पीए, विशेष कार्यकारी अधिकारी आणि स्टाफच्या नेमणुकीची लगबग सुरू झाली आहे. पण आता या नेमणुका फक्त मंत्र्यांच्या मर्जीने होणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून नावांना संमती मिळाल्यानंतरच या नेमणुका होणार आहेत. तसेच, महाविकास आघाडीच्या काळात मंत्री आस्थापनेवर काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकींनाही यावेळी ब्रेक लागण्याची शक्यता आहे. (CM Fadnavis ministery interfere in selection of private secretary pa and other staff for ministers)
हेही वाचा : Bhujbal vs Ajit Pawar : अजित पवारांनी फसवणूक केली का? छगन भुजबळ म्हणाले…
– Advertisement –
भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करताना मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच मंत्र्यांना त्यांचे खाजगी सचिव, पीए, विशेष कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या नेमणुका करता येणार आहेत. विशेष म्हणजे ही पद्धत आताच नव्हे तर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा 2014 मध्ये मुख्यमंत्रिपदावर बसले तेव्हादेखील वापरली होती. आता पुन्हा एकदा ते हीच पद्धत वापरणार आहेत. यामुळे मंत्रालयात वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर नियंत्रण मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
विशेष म्हणजे यंदा आणखी एक नियम अवलंबला जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या काळात मंत्री आस्थापनेवर काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकींनाही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. जे अधिकारी मविआच्या काळात मंत्र्यांच्या आस्थापनेवर काम करत होते त्यांना महायुती सरकारच्या मंत्र्यांसोबत काम करता येणार नाही, असे सांगण्यात येत आहे. अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुका होऊ नये यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने नावांची छाननी सुरू केल्याचेदेखील बोलले जात आहे. हे नियम मंत्रिमंडळात असलेल्या सर्वच पक्षांमधील मंत्र्यांना लागू होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.