Under 19 Asia Cup Women Team India  : भारतीय मुलींनी पटकवला अंडर-19 आशिया चषक

Under 19 Asia Cup Women Team India  : भारतीय मुलींनी पटकवला अंडर-19 आशिया चषक
मुलींच्या अंडर नाईन्टिन आशिया कप टी ट्वेन्टी स्पर्धेत भारतीय संघानं विजेतेपद पटकावलं. मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. जी. त्रिशा हिच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं २० षटकात ७ बाद ११७ धावांची मजल मारली होती. त्यानंतर आयुषी शुक्ला आणि सोनम यादवच्या प्रभावी माऱ्यासमोर बांगलादेशचा डाव ७६ धावात आटोपला. आशियाई क्रिकेट संघटनेकडून यंदा पहिल्यांदाच १९ वर्षांखालील मुलींच्या आशिया चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पहिल्याच स्पर्धेत भारतानं ऐतिहासिक कामगिरी बजावली.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed.