Sharad Pawar calls CM Devendra Fadnavis to discuss parbhani and beed cases asj


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी रविवारी (22 डिसेंबर) पुण्यातील भीमथडी जत्रेला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कार्यक्रम सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून परभणी हिंसाचार तसेच बीडमधील सरपंचांचे हत्या प्रकरण यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी बीड आणि परभणीत घडलेल्या प्रकरणांवरून सत्ताधार्यांना लक्ष्य केलेले आहे. नुकत्याच झालेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. (Sharad Pawar calls CM Devendra Fadnavis to discuss parbhani and beed cases)

हेही वाचा : Maharashtra Cabinet : नेत्यांच्या दुसऱ्या पिढीला मानाचे पान, फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवारांचा निर्णय

– Advertisement –

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी शनिवारी (21 डिसेंबर) बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. तसेच, परभणीतील हिंसाचारप्रकरणी अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर रविवारी पुणे शहरातील कृषी महाविद्यालयात भीमथडी यात्रेत शरद पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भीमथडी जत्रेतील स्टॉल्सची पाहणी केली, तसेच राज्यातील आणि राज्याबाहेरून इथे आलेल्या विक्रेत्यांशी संवाद साधला.

शरद पवार यांनी कार्यक्रम चालू असतानाच मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “तुम्ही ऐकले ना? फोनवरून काय बोलणे झाले ते? यंदा दिल्लीत साहित्य संमेलन होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावे, अशी साहित्यिकांची इच्छा आहे. त्यांनीच याबाबत सुचवले होते आणि मी त्यांना यासाठी फोन केला. त्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. तसेच, मी काल बीड आणि परभणी या ठिकाणी भेट घेऊन आलो. तेथील परिस्थितीबाबतही मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. परभणी आणि बीड येथील स्थिती गंभीर आहे त्याची नोंद घेतली पाहिजे,” अशी विनंती त्यांनी यावेळी केल्याचे सांगितले.

– Advertisement –

सविस्तर वृत्त लवकरच…



Source link

Comments are closed.