Mumbai Accident 19 year old teenager crushed 4 year old child in city asj
मुंबई : नुकतेच कुर्ल्यामध्ये एक बेस्ट बस अपघातात निष्पाप जीवांना मुकावे लागले. पण मुंबईसारख्या वर्दळीच्या ठिकाणी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक धक्कादायक अपघात पाहायला मिळाले. नुकतेच मुंबईमध्ये एका भरधाव गाडीने एका 4 वर्षाच्या मुलाला उडवल्याची घटना घडली. मुंबईतील वडाळासारख्या गजबजलेल्या भागात रविवारी (22 डिसेंबर) हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला असून 4 वर्षीय आयुष किनवडे याचा मृत्यू झाला आहे. (Mumbai Accident 19 year old teenager crushed 4 year old child in city)
हेही वाचा : Konkan Railway : कोकण रेल्वेच्या नाताळ विशेष गाड्या, संपूर्ण माहिती वाचा एका क्लिकवर…
– Advertisement –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय वाहनचालक संदीप गोळे याला अटक करण्यात आली आहे. तो ह्युंडई क्रेटा ही गाडी चालवत होता. तो विलेपार्ले येथील रहिवासी असून पोलीस पुढील तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने आरोपींनी गाडीचा वेग नियंत्रित न ठेवता बेदरकारपणे गाडी चालवल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून निष्काळजीपणामुळे त्याच्याकडून हा अपघात घडला आहे. अपघाताच्या वेळेस तो दारूच्या नशेत होता का? याचा पोलीस तपास करत असून यासंदर्भातील वैद्यकीय अहवाल अद्याप समोर आलेला नाही. तसेच, अपघाताआधी तो कुठे कुठे गेला होता? यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, 4 वर्षीय आयुष हा त्याच्या कुटुंबासोबत फुटपाथवर राहत होता. त्याचे वडील हे मजूर असून घटनेवेळी आयुष रस्त्यावर खेळत असल्याचे समोर आले आहे. भरधाव वेगात आलेल्या गाडीने यावेळी त्याला धडक दिली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील रस्ते सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याआधीही निष्काळजीपणाने गाडी चालवल्यामुळे अपघाताच्या घटना समोर आलेल्या आहेत.
दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्र राज्यात रस्ते अपघातांची सर्वाधिक संख्या आहे. 2018 ते 2022 या कालावधीत राज्यामध्ये 66,370 रस्ते अपघात मृत्यू झाले. पहिल्या स्थानावर उत्तर प्रदेश तर दुसऱ्या स्थानावर तामिळनाडू त्यानंतर महाराष्ट्र हा तिसऱ्या स्थानी येतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितले की, दरवर्षी रस्ते अपघातात 1,78,000 जीव गमावले जातात. त्यांच्यातील 60 टक्के बळी हे 18 ते 34 वयोगटातील असतात. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात या रस्ते अपघातांना आळा बसवता यावा, यासाठी नियम करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून केली आहे.
Comments are closed.