Konkan Railway Christmas and New Year special trains PPK
नाताळ सणासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता कोकण रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनल ते करमाळी दरम्यान 23 डिसेंबर ते 01 जानेवारी यामध्ये विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : ज्याप्रमाणे गणपतीत कोकणात जाणाऱ्यांची मोठी संख्या असते. त्याचप्रमाणे नाताळतही कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्यांची मोठी संख्या असते. डिसेंबर महिन्यात 20 ते 31 तारखेपर्यंत या मार्गावरील गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी आणि कोकणात किंवा गोव्याला जाणाऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वेने नाताळ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ सणासाठी कोकण रेल्वेने विशेष सोय केली आहे. (Konkan Railway Christmas and New Year special trains )
नाताळ सणासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता कोकण रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनल ते करमाळी दरम्यान 23 डिसेंबर ते 01 जानेवारी यामध्ये विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, नाताळ आणि हिवाळा हंगामासाठी कोकण रेल्वेने यापूर्वीच विविध मार्गावर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. परंतु, त्यातील बहुतांशी गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात गोव्याला जाण्याचा बेत आखणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 23 ते 31 डिसेंबर दरम्यान लोकमान्य टिकळ टर्मिनल-करमाळी ही विशेष दैनिक गाडी चालविली जाणार आहे.
– Advertisement –
हेही वाचा… Accident : रायगडमध्ये 36 तासांत दुसरी दुर्घटना, खासगी बस पेटली
कोकण रेल्वेमार्फत चालविली जाणारी लोकमान्य टिकळ टर्मिनल-करमाळी ही गाडी दररोज दुपारी 3.30 वाजता मुंबईहून सुटेल, तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल. त्याचप्रमाणे करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनल ही विशेष दैनंदिन गाडी 24 डिसेंबर ते 01 जानेवारी या दरम्यान चालविली जाणार आहे. ही गाडी दररोज पहाटे 6.45 वाजता करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.15 वाजता ती लोकमान्य टिळक टर्मिनलवर पोहोचेल. त्यामुळे नाताळसाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात किंवा गोव्याला जाणाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
– Advertisement –
या स्थानकांवर थांबा…
कोकण रेल्वेने सुरू केलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी या विशेष गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकावर थांबा असणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही कारणामुळे या दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळालेला आहे.
Comments are closed.