Second generation of leaders honored by Fadnavis, Shinde, Ajit Pawar msj


(Maharashtra Cabinet) मुंबई : महायुतीने आधी मंत्रिमंडळ विस्तार आणि नंतर खातेवाटप लांबवून आपला लौकिक कायम ठेवला आहे. महायुती सरकारच्या कारकिर्दीतील पहिले अधिवेशन काल, शनिवारी संपल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राजकारणातील दुसऱ्या पिढीला मानाचे पान दिले आहे. (Second generation of leaders honored by Fadnavis, Shinde, Ajit Pawar)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबर 2024 नागपूर येथील राजभवनात पार पडला. या विस्तारात 39 मंत्र्यांच्या समावेश केल्यामुळे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची संख्या आता 42 झाली आहे. त्याचबरोबर गेल्या सरकारमधील सुमारे 11 मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. त्यामुळे छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर यासारख्या ज्येष्ठ नेते आपली नाराजी लपवू शकले नाहीत.

– Advertisement –

हेही वाचा – Rokhthok : भारतातील लोकशाहीला स्वकीयांकडूनच धोका, संजय राऊतांच्या निशाण्यावर भाजपा

मात्र, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारने 18 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यातील काही तरुण राजकारणातील दुसऱ्या पिढीचे नेतृत्व असून त्यांना विशेष खाती देण्यात आली आहेत. भाजपाचे खंदे समर्थक पांडुरंग पुंडलिक तथा भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र आणि खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांना कामगार खाते देण्यात आले आहे. 2014पासून सलग तीनवेळा विजय मिळवत खामगाव हा भाजपाचा गड राखल्याबद्दल आकाश फुंडकर यांना दिलेली ही पोचपावती आहे, असे मानले जाते.

– Advertisement –

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना पर्यावरण आणि पशूसंवर्धन खाते देण्यात आले आहे. 2014-19 या कालावधीत ‘मुख्यमंत्रिपदा’बाबत केलेल्या वक्तव्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी नाराजी ओढावून घेतली होती, असे सांगितले जाते. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्या राजकारणातून बाजूलाच पडल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी देण्यात आली. पण त्यातही त्यांना पराभव पत्करावा लागला. पण नंतर विधान परिषद निवडणुकीत त्या विजयी तर, झाल्याच शिवाय मंत्रिमंडळात त्यांनी पुन्हा स्थानही मिळविले. महाराष्ट्रात भाजपा वाढविणाऱ्या नेत्यांपैकी एक दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे या मंत्रिपद मिळविणाऱ्या विधान परिषदेतील एकमेव नेत्या आहेत.

हेही वाचा – Atul Subhash Suicide Case : निकिताची आई बनली मंथरा, सुभाष आत्महत्याप्रकरणाची दुसरी बाजू

भाजपा खासदार नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास खाते देण्यात आले आहे. कोकणचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नितेश राणे यांना मत्स्य व्यवसाय, मच्छीमारांचे प्रश्न तसेच बंदरांच्या स्थितीबाबत चांगली जाण असल्याने त्यांच्याकडेच हे खाते सोपविण्यात आल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, नारायण राणे या दोन्ही खात्यांचे मंत्रिपद भूषविले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम राज्यमंत्री असून त्यांना गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न आणि नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषधे प्रशासन अशी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. रामदास कदम हे 2014मधील फडणवीस सरकारमध्ये पर्यावरणमंत्री होते, तर, त्याआधी त्यांच्याकडेही गृह राज्यमंत्रिपदाची (शहरे) जबाबदारी होती, हे उल्लेखनीय.

त्याचप्रमाणे, अजित पवार यांच्या बंडात साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांना सलग दुसऱ्यांदा मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यांच्याकडे महिला आणि बालकल्याण हेच खाते कायम ठेवण्यात आले आहे. पंकजा मुंडे आणि अदिती तटकरे या दोन कॅबिनेटमंत्री आहे.

युती असो की महायुती खाते तेच!

आधी शिवसेना मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजपा असे पक्ष बदलणारे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना महायुती सरकारमध्ये वन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 1995मध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये त्यांच्याकडे वन खातेच सोपविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी कामगार, पर्यावरण आणि राज्य उत्पादन शुल्क विभागांचाही कारभार पाहिला आहे. (Maharashtra Cabinet: Second generation of leaders honored by Fadnavis, Shinde, Ajit Pawar)

हेही वाचा – Sanjay Raut Vs Modi Govt : लोकशाहीच्या बाबतीत भारत कंगाल, संजय राऊत यांचा घणाघात


Edited by Manoj S. Joshi



Source link

Comments are closed.