Thackeray Brothers Raj and Uddhav Thackeray came together PPK
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी दादरमध्ये कुटुंबातील एका विवाहसोहळ्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नानिमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र आले.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे, अशी मागणी कायमच होत असते. या दोन्ही पक्षाचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते तर नेहमीच अशी पोस्ट करत असतात. मात्र, राजकारणात हे दोन्ही भाऊ कधी एकत्र येतील? याबाबत कोणीच सांगू शकणार नाही. पण राजकारणात जरी या भावांनी हातमिळवणी करणे टाळली असली तरी कौटुंबिक सोहळ्यांमध्ये या दोन्ही नेत्यांच्या भेटी होत असतात. नुकतेच मागील आठवड्यात राज आणि उद्धव यांची एका लग्नसोहळ्यात भेट होताहोता राहिली. मात्र, आज रविवारी (ता. 22 डिसेंबर) हे दोन्ही भाऊ एका कौटुंबिक सोहळ्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. (Thackeray Brothers Raj and Uddhav Thackeray came together)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी दादरमध्ये कुटुंबातील एका विवाहसोहळ्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नानिमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र आले. यावेळी या दोघांमध्ये छान संभाषण झाल्याचे तर पाहायला मिळालेच. पण बराच वेळ हे दोन्ही भाऊ एकत्र उभे होते. या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे मागील आठवड्यात 16 डिसेंबरला रश्मी ठाकरे यांचा भाचा आणि श्रीधर पाटणकर यांच्या मुलाचा लग्न सोहळा पार पडला. त्यावेळी त्या सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहिले होते. तेव्हा रश्मी ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले होते. पण या सोहळ्यात काही मिनिटांच्या फरकामुळे या दोन्ही भावांची भेट हुकली होती. मात्र, या सोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
– Advertisement –
हेही वाचा… Chandrashekhar Bawankule : एकाच खात्याचे दोन मंत्री का? मंत्री बावनकुळेंनी केला खुलासा
विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत ते आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत भाष्य केले होते. उद्धव आणि तुम्ही एकत्र यावे, अशी इच्छा नाही का? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले होते की, “माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा विषय नाही. यात चर्चा होणे गरजेचे आहे. पण, चर्चा होत नसेल, तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे. तुम्ही जगभरात बघितले, तर वर्षानुवर्षाचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येतात. मात्र, उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस जवळची वाटते, भाऊ वाटत नाही… उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये, यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. त्यात आतलेही आणि बाहेरचेही आहेत. सगळेच जण प्रयत्न करत आहेत. शिवाय, उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कोणताही ‘रिपॉन्स’ मिळत नसल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले होते.
Comments are closed.