आंतरशालेय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत राजलक्ष्मी आढावचा सुवर्ण पंच
फोर्ट येथील सेंट झेवियर शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या आंतरशालेय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत राजलक्ष्मी कांचन सागर आढाव हिने सुवर्ण पंच दिली. 48 ते 51 वजनी गटाच्या अंतिम लढतीत इशिका मेहेर हिचा पराभव करत राजलक्ष्मी हिने सुवर्ण पदक पटकावले. मुंबई स्कूल्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने 19 व 20 डिसेंबर रोजी सेंट झेवियर शाळेच्या प्रांगणात आंतरशालेय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 48 ते 51 या वजनी गटातील मुलींच्या अंतिम लढतीत दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी राजलक्ष्मी कांचन सागर आढाव व सेंट जोसेफ शाळेची इशिका मेहेर या भिडल्या. राजलक्ष्मी हिने उत्कृष्ट कामगिरी करत शिक्षकांवर मात केली आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
Comments are closed.