चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारत-पाकिस्तान सामना रंगणार
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडिया शेवटचा टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडिया आपले सर्व सामने यूएईमध्ये खेळणार आहे. या स्पर्धेत एकूण 08 संघ सहभागी होत आहेत. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाईल. ज्यासाठी पीसीबीने सहमती दर्शवली आहे. बोर्डाने एक अट घातली आहे की 2027 पर्यंत, भारतात खेळल्या जाणाऱ्या सर्व आयसीसी टूर्नामेंट केवळ हायब्रीड मॉडेलवर खेळल्या जातील.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पहिला सामना 20 फेब्रुवारीला खेळणार आहे. हा सामना बांग्लादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आपला पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. जो 23 फेब्रुवारीला खेळवला जाईल. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील आपला पुढचा सामना 02 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ज्याचे आयोजन कराचीमध्ये करण्यात येणार आहे.
आयसीसीने या स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. भारतामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जात आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली तर या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना दुबईत खेळवला जाईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तानमध्येच होणार आहे. दुसरीकडे, टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली, तर फायनलही दुबईतच होणार आहे. जर टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली नाही तर अंतिम सामना लाहोरमध्ये होणार आहे. पहिला उपांत्य सामना 04 मार्च रोजी, दुसरा उपांत्य सामना 05 मार्च रोजी आणि अंतिम सामना 09 मार्च रोजी खेळवला जाईल.
या दोन गटात संघ विभागले गेले
अ गट – पाकिस्तान, बांग्लादेश, भारत आणि न्यूझीलंड
ब गट – अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका
हेही वाचा-
IND vs AUS; माजी दिग्गजाने रोहित शर्माला दिला मोलाचा सल्ला! म्हणाला…
Year Ender 2024; यंदाच वर्ष ठरलं केकेआरसाठी खास, तिसऱ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव!
शेवटच्या वेळी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये कोणी मारली होती बाजी? भारत कितव्या स्थानी राहिला?
Comments are closed.