राहुल गांधी आज परभणीत, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सोमवारी परभणी दौऱयावर येत असून ते पोलिसांच्या अत्याचारात मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांनाही  राहुल गांधी भेटणार आहेत.

परभणी येथे संविधानाच्या विटंबनेनंतर हिंसाचार उफाळला होता. पोलिसांनी गल्लीबोळात कोम्बिग ऑपरेशन करून निष्पाप दलित तरुणांना ताब्यात घेतले. यात सोमनाथ सूर्यवंशी या कायद्याच्या विद्यार्थ्याचाही समावेश होता. कोठडीत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला. दलित चळवळीतील लोकनेते विजय वाकोडे यांचाही याच अस्वस्थतेतून हृदयविकाराने मृत्यू झाला. या दोघांच्याही कुटुंबियांची भेट घेऊन राहुल गांधी त्यांचे सांत्वन करणार आहेत.

Comments are closed.