पुण्यात डंपर चालकाने 9 जणांना चिरडले, दोन चिमुकल्यांसह तीन जण ठार
मद्यपान केलेल्या डंपर चालकाने फुटपाथ वर झोपलेल्या 9 जणांच्या अंगावर डंपर चढविल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री 1 वाजता वाघोली पोलीस चौकीजवळ घडली आहे. यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.
डंपर चालक क्रमांक MH 12 VF 0437 याने दारूच्या नशेत अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला. या अपघातामध्ये तीन जण जागीच मृत पावले असून इतर सहा जण जखमी आहेत. जखमींना प्राथमिक उपचार आयनॉक्स हॉस्पिटल येथे करून ससून रुग्णालयात रवाना केले आहे.
डंपर चालक गजानन शंकर तोट्रे 26 यास ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत
मृत व्यक्तींची नावे –
1. विशाल विनोद पवार, वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार, वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार, वय 2 वर्ष
जखमी
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे
Comments are closed.