लाडक्या बहि‍णींना डिसेंबरमध्ये पैसे मिळणारच नाही? आता पाहावी लागणार जानेवारीची वाट

राज्याचे हिवाळी अधिवेशन पार पडले की लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते. शनिवारी अधिवेशनाचे सूप वाजले. दरम्यान आता डिसेंबरचा हप्ता हा जानेवारी महिन्यात मिळणार असल्याचे समजते. त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींना जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

डिसेंबर महिना उजाडला मात्र राज्यात लाडक्या बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता अद्याप बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. राज्यात महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिण योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर आता ही रक्कम सुरू करण्याबाबत महायुतीमध्ये उदासिनता दिसत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार कधी असा प्रश्न पडला आहे.

Comments are closed.