Maharashtra Chitrarath Sanjay Raut Shivsena UBT criticized Mahayuti asj


मुंबई : दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनीच्या दिवशी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे अनेकांचे लक्ष असते. पण यंदाच्या वर्षी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला तूर्तास परवानगी न मिळाल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे महाराष्ट्रामध्ये भाजपसह महायुतीला भरभरून मत देत एकहाती सत्ता आली, पण तरीही आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनात परवानगी न मिळाल्याने विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील महायुतीवर निशाणा साधला. (Maharashtra Chitrarath Sanjay Raut Shivsena UBT criticized Mahayuti)

हेही वाचा : Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची मागणी विकासासाठी नाही तर…; संजय राऊतांचा हल्लाबोल 

– Advertisement –

खासदार संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राचा चित्ररथ का नाही? हा सवाल शिवसेना म्हणवून घेणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊ विचारला पाहिजे.” अशा शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान केले. “छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणारा चित्ररथ का डावलला? हे लोकांनी मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजेच. आम्ही एकत्र होतो, तेव्हादेखील असे सवाल आम्ही उपस्थित केले होते.” असे ते म्हणाले.

“गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार यांचा विजयरथ आहे, पण महाराष्ट्राचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्रावरचा आकस संपला नाही का? ईव्हीएमने तुम्हाला विजयी केले असले तरीही, तुम्ही महाराष्ट्रावर अशा प्रकारचा आकस का ठेवला?” असे सवाल यावेळी संजय राऊत यांनी केले. “आपला महाराष्ट्र कलेच्या क्षेत्रात उच्च स्तरावर आहे. आमच्या रथाने कर्तव्यपथावर क्रांती केली आहे. कोणाच्या तरी मनात येते आणि तुम्ही आमचा चित्ररथ रद्द करता? महाराष्ट्राने तुमचे काय घोडे मारले?” असा थेट सवाल संजय राऊत यांनी महायुतीला केला आहे.

– Advertisement –

यंदाच्या 26 जानेवारी 2025 साठी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील चित्ररथांना पथसंचलनाची परवानगी देण्यात आली आहे. पण तूर्तास तरी या यादीमध्ये महाराष्ट्राचे नाव नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. परवानगी देण्यात आलेल्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, झारखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड हरियाणा, आंध्र प्रदेश, ही राज्ये आहेत. तसेच, दीव-दमण, दादरा आणि नगरहवेली, आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांना परवागनी देण्यात आली आहे.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.