बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू लग्न बंधनात अडकली, सुंदर फोटो पाहा

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू विवाहबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये तिचं लग्न झालं. पीव्ही सिंधूच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सिंधूचं लग्न व्यंकट दत्ता साई यांच्याशी झालं आहे, जे एक व्यापारी आहेत. सिंधू आणि वेंकट यांचा विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार झाला. तिच्या लग्नाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आले होते. या लग्नाचा एक फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पीव्ही सिंधूच्या लग्नात फक्त जवळच्या नातेवाईकांसह काही सेलिब्रिटींनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. आता मंगळवारी रिसेप्शन होणार आहे. याला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावू शकतात. पीव्ही सिंधूनं महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही आमंत्रित केलं होतं. ती स्वतः वेंकटसोबत सचिनच्या घरी गेली. सिंधू आणि वेंकट यांचा विवाह उदयपूर येथील हॉटेल राफेल्समध्ये झाला.

लग्नासाठी वधू सहसा लाल पोशाख परिधान करताना दिसतात. मात्र सिंधूनं खास ‘गोल्डन क्रीम’ कलरची साडी निवडली होती. याआधी विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नातही अशाप्रकारचा खास ड्रेस दिसला होता. गोल्डन क्रीम कलरच्या साडीमध्ये सिंधू खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही तिच्या लग्नाचा फोटो येथे पाहू शकता.

29 वर्षीय पीव्ही सिंधू भारताची सर्वात यशस्वी बॅटमिंटनपटू आहे. ती दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. सिंधूनं 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. यानंतर 2020 टोकिया ऑलिम्पिकमध्ये तिनं कांस्य पदक पटकावलं. मात्र यावर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिंधूच्या हाती निराशा आली. ती पॅरिस ऑलिम्पिकच्या राऊंड ऑफ 16 मधून बाहेर पडली होती.

हेही वाचा –

IND vs AUS: मेलबर्न कसोटीत भारताची गोलंदाजी बदलणार! हा खेळाडू होणार बाहेर
IPL 2025; ध्रुव जुरेलसाठी संजू सॅमसन विकेटकीपिंगचा करणार त्याग! घेतला मोठा निर्णय
ऑस्ट्रेलियात विजय, दक्षिण आफ्रिकेला हरवले, मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान का यशस्वी?

Comments are closed.