Thackeray group criticizes Modi Shah Fadnavis over democracy and judiciary msj


नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संसदेत तर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाच, पण निवडणूक आयोगातील लोकशाही मूल्यांची माहिती देणाऱ्या नियमांवर घाला घालून डॉ. आंबेडकर यांच्या संविधानावरही हल्ला केला.

(SS UBT Vs BJP) मुंबई : जे हिटलर, मुसोलिनीने त्यांच्या देशात केले तेच भारतात घडत आहे. हिटलर, मुसोलिनी हे निवडणुकांत भरघोस बहुमताने विजयी होत असत, पण त्यांचा विजय खरा नव्हता. भारतातही तेच घडले आहे. सर्वोच्च न्यायालय हतबल किंवा सरकारचे गुलाम आहे. निवडणूक आयोग सरकारी चोर मंडळाचा हस्तक बनला आहे आणि जनता न्यायासाठी भिंतीवर डोके आपटून घेत आहे. मोदी-शहा-फडणवीस यांनी लोकशाहीची नसबंदी केली, न्याय अधिकारांची नाकाबंदी केली, अशी घणघाती टीका ठाकरे गटाने गेली आहे. (Thackeray group criticizes Modi Shah Fadnavis over democracy and judiciary)

भारताचा निवडणूक आयोग हाच लोकशाहीचा मारेकरी आहे आणि या मारेकऱ्यांना ‘सुपारी’ देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सरकार करत आहे. निवडणुकांचे निकाल ज्या पद्धतीने लागत आहेत, त्यावर मतदारांचाच विश्वास नाही. आपण दिलेले मत नक्की कोणाला गेले? ज्याचे बटण दाबले त्याला गेले की, दाबले एकाला आणि गेले फक्त कमळाला, असा गोंधळ नक्कीच उडाला आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

– Advertisement –

हेही वाचा – SS UBT about EVM : ईव्हीएम घोटाळ्यावर मोदी सरकारकडूनच शिक्कामोर्तब, ठाकरे गटाचा थेट आरोप

लोकांना ‘बॅलेट पेपर’ म्हणजे मतपत्रिकेवर निवडणूक हवी आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ईव्हीएम हवे आहे. कारण, त्या मशीनमध्ये घोटाळे करणे शक्य आहे. पुन्हा घोटाळा उघड करणारा ‘17 A’ formचा नियम बदलला की, लोकांच्या धडपडीस विचारतेय कोण? निवडणूक आयोग चोर आहे, असा हल्लाबोल सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.

– Advertisement –

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सीसीटीव्ही फुटेज आणि ‘फॉर्म 17 सीचे पार्ट 1 आणि पार्ट 2’ ही हरियाणा विधानसभा निवडणुकीशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. ही कागदपत्रे ‘सार्वजनिक’ करण्यासदेखील सांगितले होते. न्यायालयाने 9 डिसेंबर रोजी दिलेले हे आदेश सरकारच्या निवडणूक विजयाचे वस्त्रहरण करणारे ठरले असते. म्हणूनच मोदी सरकारने घाईघाईत निवडणूक नियमांमध्येच बदल केले आणि पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेश गैरलागू ठरतील, अशी व्यवस्था केली, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संसदेत तर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाच, पण निवडणूक आयोगातील लोकशाही मूल्यांची माहिती देणाऱ्या नियमांवर घाला घालून डॉ. आंबेडकर यांच्या संविधानावरही हल्ला केला. ‘17 A’चा अधिकार जनतेला नाकारणे हा फक्त संविधानाचा खून नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्तित्वाचीच हत्या आहे. पुन्हा एवढे सगळे उघडपणे होत असूनही आमची न्यायालये संविधानाची ही गळचेपी थंडपणे पाहत आहेत, असे जहरी टीका ठाकरे गटाने केली आहे. (SS UBT Vs BJP: Thackeray group criticizes Modi Shah Fadnavis over democracy and judiciary)

हेही वाचा – SS UBT Vs EC : ‘17 A’ची मागणी करणे गैर काय? ठाकरे गटाचा निशाणा निवडणूक आयोगावर


Edited by Manoj S. Joshi



Source link

Comments are closed.