‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली कोट्यावधी रुपयांना गंडा; सायबर गुन्हेगारांचा फसवणूकीचा नवा फंडा
गुन्हे बातम्या: सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) विश्वास सध्या ‘डिजिटल अटक’ या नव्या प्रकाराने धुमाकूळ घातला आहे. या नवीन प्रकारात एक निनावी व्यक्ती व्हिडिओ काॅल करतो, समोरील व्यक्ती ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स, NCB किंवा पोलिस असल्याचे सांगून थेट तुम्हाला धमकावण्यास सुरूवात करतात, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती घालून व्हिडिओ काॅलच्या आधारे तुमच्यावर पाळत ठेवून नागरिकांकडून पैसे उकळतात. या डिजिटल अटकेच्या वाढत्या घटनांमुळे सध्या पोलिसांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
21 व्या शतकात इंटरनेचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेमुळे प्रत्येक सेवा ही घरबसल्या होऊ लागली. अगदी वस्तू खरेदीपासून ते बिलं भरण्यापर्यंत घर बसल्या नागरिक ऑनलाईन व्यवहार करू लागले. यामुळे नागरिकांचा वेळ आणि काम जरी सोपं झालं असलं. तरी हे व्यवहारात करताना सायबर चोरट्यांचा धोकाही तितकाच वाढला. ऑनलाईन फसवणूकीत सध्या डिजिटल अटक या फसवणूकीच्या नव्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या गुन्ह्यांची वाढलेली व्याप्ती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून या गुन्ह्यांवर प्रकाश टाकत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले
मन की बात व्हिडिओ
‘मन की बात’च्या या व्हिडिओत एक पोलिस अधिकारी कर्नाटकमधील एका व्यक्तीला ‘व्हिडिओ कॉल’ करून त्याच्या मोबाइलनंबरबाबत 17 तक्रारी आल्या असून भविष्यात आपल्याला त्रास होणार नाही. असे सांगत नंबर ब्लॉक करण्याचे आश्वासन देऊन, फोनवरील व्यक्तीला त्याचा जबाब नोंदवण्यास सांगून त्याची खासगी माहिती विचारत आहे. तरुणाला विश्वास पटावायासाठी आरोपी स्वत: पोलिसाच्या वर्दीत बसला असून त्याच्या मागे तो पोलिस स्टेशन मध्ये बसला असल्याचे भासवत आहे.
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
डिजिटल अटक घोटाळ्यामध्ये, गुन्हेगार CBI एजंट, आयकर अधिकारी किंवा कस्टम एजंट, ED, NCB किंवा पोलिस अधिकारी म्हणून उभे राहतात आणि फोन कॉलद्वारे पीडितांशी संपर्क करून ते फोन केलेल्या व्यक्तीला व्हॉट्सॲप किंवा स्काईप सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे व्हिडिओ कम्युनिकेशनवर स्विच करण्यास धमकावतात. आर्थिक गैरव्यवहार, करचोरी किंवा इतर कायदेशीर उल्लंघनांसारख्या विविध कारणांचा हवाला देऊन सायबर चोरटे नंतर पीडितांना ‘डिजिटल अरेस्ट’ वॉरंटची धमकी देतात. काही घटनांमध्ये, हे फसवणूक करणारे पोलिस स्टेशन सारखे सेटअप तयार करतात जेणेकरून फोन केलेल्या व्यक्तीला त्यांच्यावर विश्वास बसावा.
गुजरातमधील विपुल पटेल नावाच्या व्यक्तीचा ‘X’ वरील व्हिडिओ
पुढील व्हिडिओत विपुल पटेल याला आरोपींनी व्हाॅट्स अॅप काॅल केला आहे. त्यात पोलिसांच्या गणवेशातील व्यक्ती स्वत:ची ओळख ही यूपी पोलिस मधील अधिकारीअसल्याचे सांगत आहे. तसेच विपुल यांच्याकडून आधारकार्ड आणि इतर महत्वाची माहिती जबाब नोंदवण्याच्या नावाखाली काढून घेत आहे. या पोलिस गणवेशातील व्यक्तीच्या मागे हुबेहुब पोलिस ठाण्याचा सेटअप केलेला दिसत आहे. विशेष म्हणजे त्याचा मोबाईल तसेच आधार कार्ड घातपातासाठी वापरण्यात आल्याचा दावा केला गेला, तसेच बॅक खात्यातून मनीलाॅड्रींगचाही दावा केला असून विपुल यांना 5 लाखांचा दंड असल्याचे सांगून अटकेची कारवाई होण्याची भिती घालण्यात आल्याचे दिसत आहे. हे व्हिडिओ विपुल यांनी त्यांच्या ‘एक्स पोस्ट’ वर टाकले असून अन्य व्यक्तींनी अशा सायबर चोरटयांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
डिजिटल अटक घोटाळा🚨
प्रथमच लाइव्ह रेकॉर्डिंग.
1. कृपया हा धागा वाचा, पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आम्ही अधिक लोकांना या फसवणुकीपासून वाचवू शकू. pic.twitter.com/n6s0pEuYQu
— विजय पटेल🇮🇳 (@vijaygajera) 24 ऑक्टोबर 2024
संबंधित बातमी:
High Court: मृतदेहासोबत शारिरीक संबध ठेवल्यास बलात्कार होतो का? जाणून घ्या हायकोर्ट काय म्हणालं?
अधिक पाहा..
Comments are closed.