Sanjay Raut Shivsena UBT on Guardianship in Maharashtra Government asj


मुंबई : नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ स्थापन झाले, त्यानंतर खातेवाटपही झाले. पण आता चर्चा सुरू झाली आहे ती पालकमंत्रिपदाची. कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार? यासाठी अनेक बड्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “पालकमंत्रिपद हे जिल्ह्याच्या विकासासाठी नव्हे तर मलिदा मिळावा यासाठी पालकमंत्रिपद अनेकांना हवे असते,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. तसेच, बीडचे पालकमंत्रिपद कोणाकडेही गेले? तरी सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Sanjay Raut Shivsena UBT on Guardianship in Maharashtra Government)

हेही वाचा : Thackeray Brothers : ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? संजय राऊत म्हणाले… 

– Advertisement –

खासदार संजय राऊत म्हणाले की, “बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणत्याही मुंडेंना मिळाले, तर सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का? तसेच, परभणीचेदेखील पालकमंत्रिपद कोणालाही मिळाले तरी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देऊ शकतो का? तसेच, कल्याणमध्ये पालकमंत्रिपद मिळाले तर मराठी माणसांवर अन्यान झाला तो दूर होऊ शकतो का?” असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले. ते पुढे म्हणाले की, हे सर्व फक्त सत्ता आपल्याकडे राहावी, तसेच त्या भागातील आर्थिक व्यवहारांची सूत्र आपल्याकडे रहावीत, यासाठी केलेला खटाटोप असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

सर्वांनाच हवे गडचिरोलीचे पालकमंत्रिपद

“गडचिरोलीचे पालकमंत्री पद काही लोकांना कायम आपल्याकडे हवे असते. पण हे पद नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी नाही तर, गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या असतील किंवा कोट्यावधी रुपयांचे उद्योग असतील त्यातून मलिदा खाण्यासाठी सारे काही सुरू आहे,” अशी टीका शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी यावेळी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता टोला लगावला. गडचिरोली, चंद्रपूर यांसारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. त्यातून लाभ घेता यावा, यासाठी त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून वाद सुरू असल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी केली.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.