माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी दिला रोहित शर्माला गुरुमंत्र, खराब फॉर्ममधून दिलासा मिळणार?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून कसोटीत खराब फॉर्ममधून जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये तो जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसरा सामना संपल्यानंतर रोहितने स्वतःहून चूक केल्याचे मान्य केले पण पुढच्या सामन्यांमध्ये त्याला जास्त वेळ क्रीजवर राहायला आवडेल असेही त्याने सांगितले. दरम्यान, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी रोहित शर्माला सल्ला दिला आहे.

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला नाही. दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी तो भारतात होता. दुसऱ्या कसोटीत त्याने पुनरागमन केले. रोहितने दोन सामन्यांत 19 धावा केल्या आहेत. या मालिकेत भारताचा सर्वाधिक धावा करणाऱ्या केएल राहुलला भारतीय कर्णधाराने आपले स्थान सोडले. रोहितच्या फलंदाजीच्या स्थितीबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, “त्याला डावाची सुरुवात करताना  पाहणे मला आवडले असते, परंतु आता केएल राहुलने अव्वल स्थानावर चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याने त्याच स्थानावर खेळणे सुरू ठेवले पाहिजे”.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पुनरावलोकनाबाबत शास्त्री म्हणाले, “मला रोहित शर्माला चांगली कामगिरी करताना पाहायला आवडेल. त्याच्या रणनीतीत थोडा बदल व्हायला हवा कारण तो या सहाव्या स्थानावर अजूनही खूप धोकादायक ठरू शकतो. मला वाटते की त्याने मैदानावर जाऊन विरोधी संघावर हल्ला केला पाहिजे आणि इतर कशाचीही चिंता करू नये अश्या प्रकारची त्याची मानसिकता अगदी स्पष्ट असावी”.

पुढे बोलतान शास्त्री म्हणाले, ‘रोहितने बचावात्मक मानसिकतेपासून दूर राहावे, त्याने या क्रमांकावर खेळताना विरोधी संघावर हल्ला बोलावा. पण त्याने पहिले 10-15 मिनिटे क्रीजवर सावध राहावे. त्यानंतर त्याने त्याचे नैसर्गिक खेळ खेळावे ज्याची गरज भारतीय संघाला आहे’.

हेही वाचा-

IND vs AUS: मेलबर्न कसोटीत भारताची गोलंदाजी बदलणार! हा खेळाडू होणार बाहेर
IPL 2025; ध्रुव जुरेलसाठी संजू सॅमसन विकेटकीपिंगचा करणार त्याग! घेतला मोठा निर्णय
वनडे आणि टी20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूकडे नेतृत्व

Comments are closed.