ICC Champions Trophy; फायनलमध्ये पावसाने खोळंबा घातला तर कोण ठरणार विजेता? काय आहे नियम?

आगामी ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’चे (Champions Trophy 2025) वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही. मात्र आयसीसी लवकरच याची घोषणा करेल. भारत विरूद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात (23 फेब्रुवारी) रोजी सामना खेळवला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) हायब्रिड मॉडेलसाठी यूएईची निवड केली आहे. यासोबतच आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

पीसीबीचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी नुकतीच ईसीबी अध्यक्षांसोबत बैठक घेतली होती. यानंतर यूएईच्या नावाला मंजुरी देण्यात आली. आता भारत आणि पाकिस्तान संघातील सामना दुबईत आयोजित केला जाऊ शकतो. त्याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. पण भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेशविरूद्ध (20 फेब्रुवारी) रोजी खेळू शकतो, असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा (ICC Champions Trophy) फायनल सामना (9 मार्च) रोजी खेळवला जाऊ शकतो. फायनलच्या दिवशी पाऊस पडल्यास त्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. (9 मार्च) रोजी पाऊस पडल्यास सामना (10 मार्च) रोजी होणार आहे. फायनल सामन्याबाबत इतर नियम आहेत. राखीव दिवशीही पाऊस पडला तर षटके कमी करून सामना आयोजित केला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2025; ध्रुव जुरेलसाठी संजू सॅमसन विकेटकीपिंगचा करणार त्याग! घेतला मोठा निर्णय
ऑस्ट्रेलियात विजय, दक्षिण आफ्रिकेला हरवले, मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान का यशस्वी?
वनडे आणि टी20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूकडे नेतृत्व

Comments are closed.