Winter Makeup Tips : असा करा हिवाळ्यात परफेक्ट मेकअप

थंडीच्या ऋतूत, थंड वारा आणि गरम पाण्याच्या वापरामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे आपल्याला खाज आणि जळजळ जाणवू लागते. अशा परिस्थितीत, हिवाळ्यात त्वचा हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा आपली त्वचा खराब होऊ लागते. हिवाळ्यात मेकअपचा विचार केला तर ते अधिक कठीण काम असते. खरं तर, हिवाळ्यात कोरड्या त्वचेमुळे मेकअप प्रोडक्ट्ससोबत काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. तरच आपण मेकअप करून आपली त्वचा निरोगी आणि तजेलदार ठेवू शकतो.

जर हिवाळ्यात तुमचा पार्टी मेकअप नीट होत नसेल किंवा तुमची त्वचा कोरडी होत असेल तर आज आपण जाणून घेऊयात काही अशा टिप्स आणि स्टेप्स. ज्या फॉलो करून तुम्ही हिवाळ्यातही परफेक्ट मेकअप करू शकता. मेकअप करण्याची पद्धत, स्टेप्स आणि हिवाळ्यातील मेकअपसाठी कोणती सौंदर्य उत्पादने योग्य असतील ते जाणून घेऊया.

– जाहिरात –

हिवाळ्यात मेकअप करताना या टिप्स करा फॉलो :

तुम्हाला थंडीच्या दिवसात लग्नाला जायचं असेल, तर काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही तुमचा मेकअप सुरू करायला हवा. तरच आपण स्वतःला एक परफेक्ट पार्टी लुक देऊ शकू. नाहीतर आपला चेहरा तडकलेला आणि निस्तेज दिसेल. अशी त्वचा खूप विचित्र दिसते.

आधी चेहरा करा स्वच्छ :

सर्व प्रथम, एक कापसाचा बोळा घ्या. कच्च्या दुधामध्ये हा कापसाचा बोळा बुडवून चेहऱ्यावर फिरवा. अशा रितीने चेहरा स्वच्छ करून घ्या.
आता व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील लिक्विड हातावर काढून घ्या. आणि ते चेहऱ्यावर लावून त्याने मसाज करा.
यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
स्वच्छ टॉवेलने चेहरा पुसल्यानंतर सिरम लावा. लक्षात ठेवा की आपल्याला हायलुरोनिक असलेलेच सिरम लावायचे आहे.

– जाहिरात –

असा करा स्टेप बाय स्टेप मेकअप :

चेहरा स्वच्छ करण्याचे टप्पे पूर्ण झाल्यानंतर, आता तुम्हाला तुमचा मेकअप सुरू करावा लागेल. ज्यामध्ये पहिली पायरी म्हणजे सीटीएम म्हणजेच क्लींजिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर.

सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर क्लींजिंग मिल्क लावा, मग रोजचे टोनर आणि मग तुम्ही कोणतेही मॉइश्चरायझर वापरा. शक्यतो जे तु्म्ही रोज लावता.ते चेहऱ्यावर नीट लावा.

यानंतर, मिस्ट वापरा जेणेकरून तुमची त्वचा हायड्रेटेड राहील.
आता तुम्हाला क्रीम जेल किंवा ऑइल मिक्ससह प्राइमर लावावा लागेल.

चेहऱ्यासोबतच ओठ मऊ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी ओठांवर लिप बाम लावावा.

यानंतर फाउंडेशन लावण्याची पाळी येते. ज्यामध्ये तुम्ही क्रीमी बेस्ड फाउंडेशन वापर करू शकता.

आता संपूर्ण चेहऱ्यासाला लूज पावडर लावा. लक्षात ठेवा की कॉम्पॅक्ट वापरू नये. यामुळे त्वचा अधिक कोरडी होण्याची शक्यता असते.

पावडरने लावून झाल्यानंतर , ब्रशच्या मदतीने गाल ब्लश करा.

आता डोळ्यांना आयशॅडो, लायनर आणि मस्करा लावावा.

सर्वकाही पूर्ण झाल्यानंतर, आपल्या ओठांवर लावलेला लिप बाम हलकेच काढून टाकावा आणि लिप लाइनरसह ओठांची रूपरेषा काढावी.

यानंतर, तुमच्या आवडीची कोणतीही लिप शेड ओठांवर लावा.

शेवटी, तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावर मेकअप फिक्सर स्प्रे करावे लागेल आणि ते कोरडे होऊ द्यावे लागेल. जेणेकरून तुमचा मेकअप व्यवस्थित चेहऱ्यावर टिकून राहण्यास मदत होईल.

हेही वाचा : Dry eyelashes : थंडीमुळे कोरड्या पडलेल्या पापण्यांना असे करा मॉईश्चरायझ


संपादन- तन्वी गुंडये

Comments are closed.