संविधान विरोधी विचारधारा व मुख्यमंत्री सोमनाथ सुर्यवंशीच्या हत्येला जबाबदार; राहुल गांधी यांचे टीकास्त्र
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या घटनेसाठी संविधान विरोधी विचारधारा व मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीका केली आहे.
“सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्यांची पोलीस कोठडीत हत्या करण्यात आली आणि ते संविधान वाचवण्यासाठी लढत होते” – विरोधी पक्षनेते श्री. @राहुलगांधी होय pic.twitter.com/NUsJFbwd3E
— श्रीनिवास बीव्ही (@srinivasiyc) 23 डिसेंबर 2024
सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुबीयांनी मला पोस्टमार्टम अहवाल दाखवला, व्हिडीओ दाखवले. फोटोग्राफ दाखवले. शंभर टक्के हा कोठडीतला मृत्यू आहे. पोलिसांनी सोमनाथ सुर्यवंशीची हत्या केली आहे. मुख्यमंत्री या घटनेबाबत पोलिसांना संदेश देण्यासाठी विधानसभेत खोटं बोलले. या तरुणाला तो दलित आहे म्हणून मारलं. तो संविधानाची रक्षा करत होता म्हणून मारलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवकाची विचारधारा संविधानाला संपविण्याची आहे. ही हत्या आहे. याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत, संविधान विरोधी विचारधारा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
Comments are closed.