मोठी बातमी! विनोद कांबळीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू ‘विनोद कांबळी’ची (Vinod Kambli) प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यांना ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कांबळीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. अलीकडेच ‘सचिन तेंडुलकर’ला (Sachin Tendulkar) भेटल्यानंतर तो चर्चेत आला होता. कांबळी हा गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्याच्या व्यसनाधीनतेमुळे त्याला खूप त्रास होत आहे. यासाठी तो अनेकवेळा पुनर्वसन केंद्रातही गेला आहे.
हृदयविकारासोबतच कांबळी इतर समस्यांमधूनही जात आहे. यापूर्वीही त्याची प्रकृती खालावली होती. आता पुन्हा एकदा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. जर सर्व काही ठीक झाले तर त्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप आली नाही.
कांबळीने भारतासाठी अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 104 वनडे सामने खेळले. दरम्यान त्याने 2 शतकांसह 14 अर्धशतके झळकावली. यासह 2,477 धावा केल्या. त्याची वनडे सर्वोत्तम धावसंख्या 106 धावा आहे. कांबळीने 17 कसोटी सामनेही खेळले आहेत. यामध्ये 1,084 धावा केल्या आहेत. कांबळीची तुलना एकेकाळी अनेक बड्या क्रिकेटपटूंशी केली जात होती. पण तो सध्या वाईट काळातून जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सुनील गावस्करांचा टीम मॅनेजमेंटवर राग, अश्विनसोबत झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला!
माजी क्रिकेटपटूने निवडले यंदाच्या वर्षातील टाॅप-5 टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाज!
IND vs AUS; मेलबर्नच्या खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत? फलंदाज की गोलंदाज?
Comments are closed.