शाळा कॉलेजच्या सुट्ट्या, न्यू इयरमुळे भुजबळांचा प्रश्न अडकला; मुख्यमंत्र्यांनी पु्न्हा 10-12 दिवसांनी भेटण्यास सांगितलं
महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. मात्र त्या विस्तारानंतर अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीत नाराजी पसरली, त्यात सगळ्यात महत्त्वाचं नाव छगन भुजबळ यांचं आहे. ते प्रचंड नाराज झाले आहेत. त्याबाबत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांच्या नाराजीबाबत चर्चा रंगल्या असताना आज त्यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर छगन भजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा ते बारा दिवसात यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे भुजबळ म्हणाले.
छगन भूजबळ माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मी आणि समीर भुजबळ दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. यावेळी सामाजिक, राजकीय विषय होते. तसेच काय काय घडले, काय सुरू आहे त्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी फडणवीस यांनी सांगितले की, वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी मी पाहिल्या, ऐकल्या आहेत. त्यानंतर त्यांनीच सांगितले की, यावेळेला महायुतीला जो विजय मिळाला त्याच्या मागे ओबीसीचे मोठ्या प्रमाणात पाठबळ लाभले. त्याचासुद्धा मोठा वाटा आहे. ओबीसींनी विशेषता यावेळेला महायुतीला जो आशीर्वाद दिला, त्याबद्दल आपण सर्वांचेच आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचे नुकसान होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसीचे नुकसान होऊ देणार नाही. पण आता जे काय राज्यामध्ये सुरू आहे त्याची कल्पना आहे. पुढचे पाच-सहा दिवस मुलांच्या शाळा कॉलेजना सुट्ट्या पडलेल्या आहेत. आठ-दहा दिवसानंतर तुम्ही परत या तेव्हा पुन्हा भेटू आणि निश्चितपणे यावर चांगला मार्ग शोधून काढू असे फडणवीस म्हणाले. शिवाय त्यांनी विनंती केली की, ओबीसी नेत्यांना सांगा की, मी जरूर त्यावर साधकबादक विचार करतोय, हा निरोप ओबीसी आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व घटकांना द्या. आपण थोड्या शांततेने 10-12 दिवसांमध्ये जेवढं काही चांगलं करता येईल, मार्ग काढता येईल त्याबाबत आपण संपूर्ण चर्चा करूया असंही फडणवीसांनी आश्वासन दिल्याचे भुजबळ म्हणाले.
Comments are closed.