इशान किशनने ठोकले शानदार शतक! किशनसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडणार?
सध्या विजय हजारे ट्राॅफी (Vijay Hazare Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यामध्ये भारताचा प्रतिभावान खेळाडू ‘इशान किशन’ने (Ishan Kishan) विजय हजारे ट्रॉफी 2024च्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने दमदार कामगिरी करत शतक झळकावले. इशानच्या शतकाच्या जोरावर झारखंडने मणिपूरचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. शतकासोबतच इशानने भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले आहेत. बीसीसीआय 2025च्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’साठी (Champions Trophy) इशानकडे लक्ष देऊ शकते.
वास्तविक, मणिपूरने प्रथम फलंदाजी करताना 253 धावा केल्या. यादरम्यान जॉन्सनने 82 चेंडूंचा सामना करत 69 धावा केल्या. तर प्रियोजितने 49 चेंडूंचा सामना करत 43 धावा केल्या. प्रत्युत्तरात झारखंडने 2 गडी गमावून सामना जिंकला. झारखंडकडून इशानने शतक झळकावले. त्याने 78 चेंडूंचा सामना करत 134 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 चौकारांसह 6 षटकार ठोकले.
इशान किशन (Ishan Kishan) बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघापासून बाहेर आहे. त्याने त्याचा शेवटचा वनडे सामना ऑक्टोबर 2023 मध्ये अफगाणिस्तानविरूद्ध खेळला होता. तेव्हापासून तो भारतीय संघात पुनरागमन करू शकला नाही. पण आता त्याला संधी दिली जाऊ शकते. इशानने अरूणाचल प्रदेशविरूद्धही शानदार अर्धशतक झळकावले होते. त्याने 77 नाबाद धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! विनोद कांबळीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
सुनील गावस्करांचा टीम मॅनेजमेंटवर राग, अश्विनसोबत झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला!
माजी क्रिकेटपटूने निवडले यंदाच्या वर्षातील टाॅप-5 टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाज!
Comments are closed.