प्रजासत्ताक दिनाला यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या चित्ररथाचा समावेश

यंदा प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाहिये. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाला यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ दिसणार आहे.

26 जानेवार प्रजासत्ताक दिनी राज्यांचे चित्ररथ असतात. महाराष्ट्राचे चित्ररथ नेहमी हे लक्षवेधक असतात आणि त्यांना पुरस्कारही मिळतात. 1971 ते 2023 पर्यंत महाराष्ट्राला 14 वेळा उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला होता. इतकंच नाही तर सलग तीन वेळा हा पुरस्कार महाराष्ट्राने मिळवला होता.

प्रजासत्ताक दिनी चित्ररथावरून वाद होता. त्यामुळे तीन वर्षांतून एकदा तरी चित्ररथ सादर करण्याचा नियम संरक्षण मंत्रालयाने केला होता. संरक्षण मंत्रालयाच्या समितीली चित्ररथ आवडण्याचीही अट आहे. यंदा कर्तव्यवपथावर महाराष्ट्राचा रथ दिसणार नाहीये. गुजरात, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि पश्चिम बंगालचा चित्ररथ दिसणार आहे.

Comments are closed.