जेफ बेजोस यांनी लग्नाचे वृत्त फेटाळले

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी लग्न करत असल्याचे वृत्त फेटाळले आहे. गर्लफ्रेंड लॉरेन सांचेजसोबत लग्न करत असल्याची बातमी पूर्णपणे निराधार असून चुकीची आहे, असे जेफ बेजोस यांनी म्हटले आहे. 28 डिसेंबरला जेफ बेजोस लग्न करणार असून या लग्न सोहळ्यात 5 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, हे सर्व खोटे आहे. असे काहीही नाही. खोटे खूपच वेगाने पसरवले जाऊ शकते. चाहत्यांनी अलर्ट राहावे. हे खरंच विश्वास ठेवण्यासारखे नाही. लग्न सोहळ्यावर पाच हजार कोटी रुपये खर्च कशाला करेन, असे बेजोस म्हणाले.

बेजोस यांच्या लग्नाच्या वृत्तानंतर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी एक पोस्ट शेअर करत बेजोस यांना शुभेच्छा दिल्या होत्या. बेजोस आणि सांचेज हे जानेवारी 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत. मे 2023 मध्ये दोघांनी साखरपुडाही केला होता. परंतु बेजोस यांनी लग्नाचे वृत्त फेटाळले आहे. दरम्यान, हा विवाहसोहळा केवीन कॉस्टनरच्या 160 एकरच्या व्हीआयपी फॉर्मवर होणार असून यासाठी तब्बल 5 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असे वृत्त पसरल्यानंतर जेफ बेजोस यांनी पुढे येत या सगळ्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

Comments are closed.