आयफेल टॉवरला आग, 1200 पर्यटकांची सुखरूप सुटका

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील आयफेल टॉवरमध्ये आज आग लागली. मात्र, बचाव पथकाने तत्काळ 1200 पर्यटकांची सुखरूप सुटका केली. नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

आयफेल टॉवरची देखभाल करणाऱ्या कंपनीने सांगितले की, एलिव्हेटेड पॉवर रेल्वेमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे सकाळी 10.50 वाजता अलार्म वाजू लागला. टॉवरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरही अलार्म वाजू लागला. दरम्यान, आयफेल टॉवरला भेट देण्यासाठी रोज हजारो पर्यटक येतात. ख्रिसमस सणाचा फ्रान्ससह युरोपात सर्वत्र उत्साह आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पर्यटकांची गर्दी होती. आगीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. बचाव पथकाने तातडीने सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले.

Comments are closed.