बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, हर्षदीप कांबळे बेस्टचे महाव्यवस्थापक; अनिल डिग्गीकरांकडे दिव्यांग कल्याण विभाग

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप होताच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली दिव्यांग कल्याण विभागात अपर मुख्य सचिव पदावर केली आहे. तर उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्यावर बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अन्य बदल्या खालीलप्रमाणे

  • डॉ. राधाकृष्णन बी. (मुख्यमंत्र्यांचे सहसचिव) – महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
  • डॉ. पी. अनबलगन (महाजेनकोचे अध्यक्ष) – उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाचे सचिव
  • संजय दैने (गडचिरोली जिल्हाधिकारी) – वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर
  • राहुल कर्डिले (वर्धा जिल्हाधिकारी) – महापालिका आयुक्त नाशिक
  • वनमाठी सी. (विक्रीकर सह आयुक्त) – वर्धा जिल्हाधिकारी
  • संजय पवार (चंद्रपूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी) – विक्रीकर सह आयुक्त, मुंबई
  • अविष्यन्त पांडा (वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर) – जिल्हाधिकारी गडचिरोली
  • विवेक जॉन्सन – चंद्रपूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी
  • गोपीचंद कदम – मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी सोलापूर
  • अण्णासाहेब चव्हाण (उपायुक्त पुणे विभागीय कार्यालय) – मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, मुंबई

Comments are closed.