ख्रिसमस, थर्टी फर्स्टसाठी मुंबई पोलीस सज्ज
24, 25 आणि 31 डिसेंबरला गृह विभागाने पहाटे 5 वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच या तिन्ही दिवशी नागरिक जल्लोष करण्याच्या मूडमध्ये असल्याने याचा समाजकंटकांकडून कुठलाही गैरफायदा उचलला जाऊ नये याकरिता मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी मंगळवार रात्रीपासून शहरात कोम्बिंग ऑपरेशन, हॉटेल-लॉजिंगची तपासणी आणि नाकाबंदीवर जोर दिला आहे. ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टनिमित्त हॉटेलबरोबरच समुद्रकिनाऱयांवरदेखील पाटर्य़ांचे आयोजन केले जाते. शिवाय मोठय़ा संख्येने नागरिक चौपाट्यांवरदेखील जातात. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवरदेखील तगडी गस्त ठेवण्यात येणार आहे.
Comments are closed.