Chennai-based Surmount Logistics Solutions company gifted its employees Bullet Tata Tiago and Activa rrp


गेल्या काही काळापासून सणानिमित्त, विशेषत: दिवाळीत कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याचा ट्रेंड भारतात झपाट्याने वाढत आहे. चेन्नईस्थित एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन चाकी आणि चारचाकी गाडी भेट देऊन सन्मानित केले आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून सणानिमित्त, विशेषत: दिवाळीत कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याचा ट्रेंड भारतात झपाट्याने वाढत आहे. कंपनीच्या अशा पावलांमुळे कर्मचाऱ्यांचे कौतुक तर होतेच शिवाय त्यांची कामाप्रती निष्ठा आणि चिकाटी वाढते. त्यामुळे ते कंपनीसोबत नाते घट्ट करत उत्साहाने काम करतात. चेन्नईस्थित एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन चाकी आणि चारचाकी गाडी भेट देऊन सन्मानित केले आहे. (Chennai-based Surmount Logistics Solutions company gifted its employees Bullet Tata Tiago and Activa)

चेन्नईस्थित कंपनी सरमाउंट लॉजिस्टिक सोल्युशन्सने हाच ट्रेंड कायम ठेवत आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कठोर परिश्रम आणि कंपनीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल टाटाची टियागो कार, होंडाची ॲक्टिव्हा स्कूटर आणि रॉयल एनफिल्डची बुलेट 350 बाईक देऊन सन्मानित करण्यात आले. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे 20 कर्मचाऱ्यांना भेट म्हणून गाड्या देण्यात आल्या आहेत.

– Advertisement –

कंपनीने भेट दिलेल्या वाहनांमध्ये टाटा टियागो आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 5 लाख रुपये आहे. तर, रॉयल इन फील्ड 350 बुलेट, ज्याची किंमत 1.98 लाख रुपये आहे. याशिवाय होंडा एक्टिवा स्कूटर, ज्याची सुरुवातीची किंमत 76,684 रुपये आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डेन्झिल रायन यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांचा कामाप्रती उत्साह कायम ठेवण्यासाठी अशा गोष्टी करणे गरजेचे असते. कर्मचारी निष्ठेने काम करतात आणि यामुळे कामात फायदा देखील दिसून येतो.

हेही वाचा – Kumar Vishwas on Baba Ramdev : …अन्यथा मीठ सडले असते, कुमार विश्वासांचा बाबा रामदेवांवर निशाणा

– Advertisement –

भारतात कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याचा ट्रेंड

कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याचा ट्रेंड 2015 मध्ये प्रकाशझोतात आला. सुरतमधील हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी दिवाळीनिमित्त त्यांEdited By Rohit Patilच्या कर्मचाऱ्यांना 491 कार आणि 200 फ्लॅट भेट म्हणून दिले होते. यानंतर त्यांनी 2016 मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना 1,260 कार गिफ्ट दिल्या. 2023 मध्ये त्यांची कंपनी हरे कृष्णा एक्सपोर्ट्सने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुमारे 600 कार भेट दिल्या. महत्त्वाचे म्हणजे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार कर्मचाऱ्यांना गाड्यांच्या चाव्या दिल्या होत्या.

दिवाळी सणानिमित्त कोणी काय-काय दिले?

दरम्यान, यंदाच्या वर्षी दिवाळी सणानिमित्त हरियाणातील एका फार्मास्युटिकल कंपनीने चांगेल काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना 15 एसयूव्ही कार भेट दिल्या आहेत. तर चेन्नईतील टीम डिटेलिंग सोल्युशन्सने यावर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना 28 कार आणि 29 बाईक भेट दिल्या आहेत. तमिळनाडूमधील एका चहाचा मळा असलेल्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना 15 रॉयल एनफिल्ड बाईक भेट म्हणून दिल्या आहेत.

हेही वाचा – Manu Bhaker : देशासाठी पदक जिंकूनही…; खेलरत्न पुरस्कार यादीतून वगळल्यानंतर मनू भाकरची नाराजी


Edited By Rohit Patil



Source link

Comments are closed.