Pune Crime satish wagh murder case detail wife gave contract asj
पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आलेली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी ही त्यांच्याच पत्नीने दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणात पोलीस गुन्हे शाखेने त्यांच्या पत्नीला अटक केली असून पुढील चौकशी अद्याप सुरू आहे. पण ही माहिती समोर येताच राज्यात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime satish wagh murder case detail wife gave contract)
– Advertisement –
समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची त्यांचीच बायको मोहिनी वाघने सुपारी दिली होती. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी वाघचे प्रेम संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रेम प्रकरणात सतीश वाघ हे आडवे येत असल्याने त्यांची 5 लाखांची सुपारी देण्यात आली. याबाबतची कबुली स्वतः मोहिनी वाघने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नीच मास्टरमाईंड निघाल्याने एकच खळबळ उडाली. सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. मोहिनी वाघ (सतीश वाघ यांच्या पत्नी), पवनकुमार शर्मा, विकास शिंदे, अतिश जाधव आणि अक्षय जवळकर अशी या पाच जणांची नावे आहेत. या प्रकरणी अक्षय जवळकरला सुपारी देण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
नेमकं काय घडलं?
9 डिसेंबरला पहाटे अज्ञात व्यक्तींनी भाजप आमदार योगेश टीळेकर याचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण केले. नंतर त्यांना गाडीतून अज्ञान स्थळी घेऊन जाण्यात आले. सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांतच आरोपींनी त्यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सतीश वाघ यांच्यावर तब्बल 72 वेळा चाकूने वार करण्यात आले. त्यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी टाकण्यात आले. त्याचदिवशी संध्याकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते.
– Advertisement –
Edited by Abhijeet Jadhav
Comments are closed.