Anjali Damania tweeted about Dhananjay Munde Valmik Karad and Devendra Fadnavis asj


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण चांगलेच गाजते आहे. तसेच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अंजली दमानिया यांनी काही ट्विट करत हत्येचा आरोप असणारा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहनदेखील केले आहे. (Anjali Damania tweeted about Dhananjay Munde Valmik Karad and Devendra Fadnavis)

हेही वाचा : Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गुन्हेगार माझ्या जवळचा असला, तरी…” 

– Advertisement –

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पहिल्यांदा ट्विट केले. यामध्ये त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा एक व्हिडीओ शेअर केला. तसेच, धनंजय मुंडे यांच्या हातात एक पिस्तुल असल्याचाही एक व्हिडीओ शेअर केला. “हे असले बॉस? इंस्टाग्रामवर असे रील्स दाखवल्यानंतर नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का? देशाबद्दल हे व्हिजन असणार आहे का? ताबडतोब बीडमधील सगळे शस्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा” अशी मागणी करत त्यांनी मुंडेंवर टीका केली.

– Advertisement –

या ट्विटनंतर अंजली दमानिया यांनी आणखी एक ट्विट केले. “हे पोलिस आहेत का या वाल्मिक कराडांचे नोकर? एसपी नवनीत कवत यांनी ताबडतोब आदेश द्यावे की कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याने यापुढे जी हुजुरी करता कामा नये.” असे म्हणत निशाणा साधला आहे.

तसेच, तिसऱ्या पोस्टमध्ये अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे की, महाराष्ट्रातील सर्व शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावण्यात यावी. जिथे गरज नाही त्यांच्याकडील सर्व शस्त्र परवाने रद्द करावेत. महाराष्ट्र हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, गुंडांचा नाही.” असे नमूद केले आहे.


Edited by Abhijeet Jadhav





Source link

Comments are closed.