Thackeray faction upset over Congress’s criticism of AAP msj
निवडणूक आयोग पारदर्शकतेच्या बाबतीत नाकाने कांदे सोलत आहे, पण पडद्यामागे भाजपाच्या फायद्याचे बरेच काही सुरू आहे. दिल्लीची विधानसभा निवडणूक हायजॅक करण्यासाठी भाजपा कोणतीही पातळी गाठेल.
(Congress Vs AAP) मुंबई : नवी दिल्लीत 2020मध्ये झालेल्या निवडणुकीत ‘आप’ला 70 पैकी 62 जागांवर विजय मिळाला होता आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपाला खडे चारले होते. आताही भाजपा विरुद्ध आप असाच सामना आहे. काँग्रेस पक्ष रिंगणात आहे आणि भाजपाऐवजी काँग्रेस, केजरीवाल आणि ‘आप’वर हल्ले करीत आहे. देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हुकूमशाहीविरुद्ध लढत असताना काँग्रेस भाजपाऐवजी ‘आप’वर चिखलफेक करीत आहे. दिल्लीतील जनतेला याचे आश्चर्य वाटत असावे, अशी टीका ठाकरे गटाने काँग्रेसवर केली आहे. (Thackeray faction upset over Congress’s criticism of AAP)
दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि नायब राज्यपाल हे अशा प्रदेशांचे सर्वेसर्वा असतात. पण नायब राज्यपाल हे गृहमंत्रालयाचे एजंट म्हणून कर्तव्य बजावताना सध्या दिसतात. आचारसंहिता लागू होताच दिल्लीतील मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांचे सर्व अधिकार काढून घेतले जातात, पण दिल्लीचे नायब राज्यपाल भाजपासाठी काम करत असतात. हे धोकादायक असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.
– Advertisement –
हेही वाचा – SS UBT Vs ECI : पारदर्शकता आणि नैतिकतेच्या गप्पा करू नका, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सुनावले
दिल्ली विधानसभेत पैशांचा खेळ होणारच होणार, पण वाहने आणि हेलिकॉप्टर तपासली जातील ती विरोधकांची आणि भाजपाचे लोक गाड्या, टेम्पो भरभरून पैशांची वाहतूक करतील. त्यांना मात्र अभय मिळेल. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत. या दोघांनीही दिल्ली विधानसभेच्या प्रचारापासून दूर राहण्यातच नैतिकता आणि लोकशाहीचे हित आहे, असेही ठाकरे गटाने नमूद केले आहे.
– Advertisement –
निवडणूक आयोग पारदर्शकतेच्या बाबतीत नाकाने कांदे सोलत आहे, पण पडद्यामागे भाजपाच्या फायद्याचे बरेच काही सुरू आहे. दिल्लीची विधानसभा निवडणूक हायजॅक करण्यासाठी भाजपा कोणतीही पातळी गाठेल. लोकांनी सावध राहावे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून सुचविले आहे. (Congress Vs AAP: Thackeray faction upset over Congress’s criticism of AAP)
हेही वाचा – Delhi Election 2025 : नवी लोकशाही देशात उदयास आली, ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा
Comments are closed.