गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी..; गुलाबराव पाटलांचा इशारा

जळगाव : गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) ज्याही पक्षात जातील त्याच पक्षावर शिंतोडे उडतील. जिल्हा बँकेतील शेतकर्‍यांचे पैसे गुलाबराव देवकरांनी घेतले आणि ते अजून फेडले नाही. मजूर फेडरेशनच्या माध्यमातून मजूरांचे पैसे घेऊन कर्ज घेतले आहे. मजूर सोसायटीच्या चौकशी संदर्भात डीडीआर यांची बैठक घेणार आहे. त्यात असलेले सर्व भ्रष्टाचारांचे कागदपत्र माझ्याकडे तयार आहे. या मजूर सोसायटीमध्ये सरकारी नोकर आहेत, जे आयटी रिटर्न भरतात असे मजूर सोसायटीत आहेत आणि या सोसायट्यांचा बॉस गुलाबराव देवकर आहेत. एवढा भ्रष्टाचार असतानाही ज्यांना गुलाबराव देवकरांना पक्षात घ्यायचं असेल त्यांनी घ्यावं. अशी टीका करत पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी गुलाबराव देवकरांवर (Gulabrao Deokar)  निशाणा साधला आहे.  गुलाबराव देवकर यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीवर ते बोलत होते.

देवकर ही चार वर्षाकरिता शिक्षेला असलेल्या स्थगिती मिळाली म्हणून घरात आहेत. गुलाबराव देवकरांच्या शिक्षेला मिळालेली स्थगिती यासाठी देखील मी न्यायालयात जाणार आहे. गुलाबराव देवकर हे साधू नाही तर घरकुल खाऊन उभे झालेला माणूस आहेत. मी यांना सोडणार नाही, त्यांच्या विरोधात मी न्यायालयात जाणार आहे. घरकुल घोटाळ्यात गुलाबराव देवकर हे बाहेर का? याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे. किंबहुना ज्या पक्षाला वाटत असेल त्यांनी गुलाबराव देवकरांना पक्षात घ्यावं, अशी टीका ही मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस नक्षत्र पाहून काम करणारे, त्यामुळे ते राहू केतू सर्व बघतील

कुठलं झाड आता यांना वाचवायला राहिलेलं नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटून आम्ही काय चांगले आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्षत्र पाहून काम करणारे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे ते राहू केतू सर्व बघतील. यांना काय शिक्षा द्यायची ते देवेंद्र फडणवीस वेळेवर बरोबर देतील. अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर ते बोलत होते.

कायद्याने पैसे मागणे हाच गुन्हा- गुलाबराव पाटील

लाच ही लाच असते, ती कोणत्या विभागाने सर्वाधिक घेतली यापेक्षा लोकांना त्रास होत असल्यामुळेच लोक या मार्गावर जात असतात. त्यामुळे सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना आमच्या सूचना आहेत आलेल्या माणसांचे समाधान करा. कायद्याने पैसे मागणे हाच गुन्हा आहे. अधिकार्‍यांना चांगला पगार आहे. त्यामुळे लाच लुचपतकडे कुणी जाणार नाही, असे अधिकार्‍यांनी वागले पाहिजे. असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.