Sanjay raut slams amol kolhe statement thackeray group not active after assembly election-ssa97


मुंबई : काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ होत नाही. ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा होण्यास तयार नाही, अशा शब्दांत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मित्रपक्षांना घरचा आहेर दिला होता. यानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी अमोल कोल्हेंच्या विधानावरून फटकारलं आहे.

महाराष्ट्रात बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेनं घेतली आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

– Advertisement –

हेही वाचा : वाद पेटला! वडेट्टीवारांची ‘ती’ शंका अन् काँग्रेसनं जागावाटपात कसा घोळ घातला राऊतांनी थेटच सांगितलं

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेनं घेतली आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही. आम्ही जमिनीवर आहोत. लढणारा आमचा पक्ष आहे. आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही, विकलो गेलेलो नाही.”

– Advertisement –

“आमच्या पक्षातील कुणी सांगत नाही, दुसऱ्या गटात जाऊन सत्तेत सामील होऊया. आमचे वीस आमदार आहेत. त्यातील एकाचेही मत नाही, समोर फुटलेल्या गटात सामील होऊन सत्तेची उब घेऊया. हे आमच्यात कुणी सांगत नाही. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली लढत राहू,” अशी भूमिका राऊत यांनी स्पष्ट केली.

“लोकसभेनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. तसेच विधानसभेनंतर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये समन्वय राहिला नाही, हे सत्य आहे. तो समन्वय नाही राहिला, तर त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागणार आहे,” असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

“इंडिया आघाडी लोकसभेसाठीच स्थापन झाली होती. कुठेही विधानसभेला त्याचा प्रभाव पडला नाही. प्रत्येकजण आपलेच घोडे दामटवत राहिले, हे सत्य आहे. इंडिया किंवा महाविकास आघाडीसंदर्भात लोकांनी वेगळ्या भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे. मात्र, सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला पाहिजे. आम्ही सगळे प्रादेशिक पक्ष आहोत. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षनेते आहे. सगळ्यांना एकत्र ठेवणे आणि इंडिया आघाडी टीकवण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. इंडिया किंवा महाविकास आघाडी विसर्जित करणे, हा फार टोकाचा निर्णय आहे. यात काही दुरूस्ती करता येईल का, याचा विचार करायला पाहिजे.

हेही वाचा : “बायकोचे तोंड कितीवेळ बघणार? रविवारीही काम करा…”, L&T च्या ‘CEO’ची मुक्ताफळे



Source link

Comments are closed.