TCS चा हंगामा! नफ्यात झाली मोठी वाढ, गुंतवणूकदार मालामाल, कंपीनीने किती दिला लाभांश?
TCS नफा: IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीचे (ऑक्टोबर-डिसेंबर) आकडेवारी जाहीर केली आहे. TCS ने तिसऱ्या तिमाहीत 12380 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत TCS चा नफा 11058 कोटी रुपये होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नफा 12 टक्क्यांनी वाढला आहे. TCS साठी, हा नफा त्याच्या अंदाजापेक्षा जास्त आहे.
TCS च्या महसुलात वार्षिक आधारावर 6 टक्क्यांनी वाढ
तिसऱ्या तिमाहीत TCS चा एकत्रित महसूल 6 टक्क्यांनी वाढला आहे. हा महसूल 63973 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत 60,583 कोटी रुपये होता. हे अपेक्षेपेक्षा थोडे कमी आहे. तिमाही ते तिमाही आधारावर पाहिले तर, TCS च्या निव्वळ नफ्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
TCS लाभांश केला जाहीर
यावेळी कंपनीने तिसरा अंतरिम लाभांश म्हणून 10 रुपये लाभांश जाहीर केला आहे. यासोबतच 66 रुपयांचा विशेष लाभांशही जाहीर केला आहे. स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत, टीसीएसने सांगितले आहे की लाभांशाची रेकॉर्ड तारीख 17 जानेवारी निश्चित केली आहे आणि त्याची पेमेंट तारीख 3 फेब्रुवारी असणार आहे.
TCS च्या शेअरची किंमत
काल कंपनीच्या तिमाही निकालापूर्वी, TCS चे शेअर्स 64.40 रुपये किंवा 1.57 टक्क्यांनी घसरिन 4044 रुपये प्रति शेअरवर बंद झाले. आता बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या निकालाच्या आधारे, TCS चे शेअर्स आज ( 10 जानेवारी) वाढण्याची अपेक्षा आहे.
ऑक्टोबर-डिसेंबर तिसऱ्या तिमाहीत, कंपनीचे एकूण ऑर्डर बुक 10.2 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. मागील तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबर दरम्यान, TCS चे ऑर्डर बुक मूल्य 8.6 अब्ज डॉलर होते. जर आपण एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीबद्दल बोललो तर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची ऑर्डर बुक एकूण 8.1 बिलियन डॉलर होती.
अधिक पाहा..
Comments are closed.