महिन्याला 5000 रुपये गुंतवा, काही काळातच लाखो रुपये मिळवा, आयुष्यभर पेन्शनची सोय करा

गुंतवणूक योजना: NPS म्हणून ओळखली जाणारी नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक सरकारी योजना आहे. वृ्द्ध काळात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सरकारने ही योजना आखली आहे. या योजनेद्वारे तुम्हा स्वत:साठी एक चांगला रिटायरमेंट फंड जमा करु शकता. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही निवृत्तीच्या वयात पेन्शनचीही व्यवस्था करु शकता. जाणून घेऊयात या योजनेबाबत सविस्तर माहिती.

जर तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षीपासून जरी तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरु केली तर तुम्हाला चांगला फायदा होतो.  रमहा 5000 रुपये जमा केले, तर तुम्हाला वृद्धापकाळात सेवानिवृत्ती निधी म्हणून किती एकरकमी रक्कम मिळेल आणि तुम्हाला किती पेन्शन मिळेल? याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
NPS ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे. म्हणजेच तुम्ही त्यात जे काही योगदान द्याल, त्याचा परतावा बाजारानुसार ठरवला जातो.

एनपीएसमध्ये दरमहा 5000 रुपये गुंतवले तर…

तुम्ही जर वयाच्या 35 व्या वर्षापासून एनपीएसमध्ये दरमहा 5000 रुपये गुंतवले आणि 60 वर्षे सतत गुंतवणूक केली, तर तुम्हाला एकूण 25 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक ही 15,00,000 रुपये होणार आहे. जर तुम्हाला या सर्व रकमेवर 10 टक्क्यांचा परतावा मिळाला तर तुम्हाला 47,17,573 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे तुमचा एकूण निधी 62,17,573 रुपये होईल. तुम्ही या रकमेपैकी 40 टक्के रक्कम वार्षिकीमध्ये गुंतवल्यास, तुम्हाला 24,87,029 रुपये वार्षिकीमध्ये गुंतवावे लागतील. अशा परिस्थितीत, वयाच्या 60 व्या वर्षी, तुम्ही एकरकमी 37,30,544 रुपये निवृत्ती निधी म्हणून घेऊ शकता. जर तुम्हाला ॲन्युइटीवर 7 टक्के परतावा मिळत असेल तर तुम्ही दरमहा 14,508 रुपये पेन्शन म्हणून घेऊ शकता.

कसं कराल गुंतवणुकीचं नियोजन?

जर तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी 5,000 रुपये घेऊन NPS मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि दरवर्षी 5 टक्के टॉप-अप करत असाल, तर तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत सतत एकूण 28,63,626 रुपये गुंतवाल. जर तुम्हाला 10 टक्के व्याजदराने  परतावा मिळत असेल तर तुम्हाला 65,52,837 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे तुमचा एकूण निधी 94,16,463 रुपये होईल. तुम्ही या रकमेपैकी 60 टक्के पैसे निवृत्ती निधी म्हणून घेतल्यास आणि 40 टक्के वार्षिकीमध्ये गुंतवल्यास, तुम्हाला एकरकमी 56,49,878 रुपये मिळतील. तर 40 टक्के दराने वार्षिकीमध्ये 37,66,585 रुपये गुंतवून, जर तुम्हाला 7 टक्के परतावा मिळत असेल, तर तुम्हाला दरमहा 21,972 रुपये पेन्शन म्हणून मिळतील.

बॅलन्स्ड लाइफसायकल फंड म्हणजेच BLC मध्ये, गुंतवणूक इक्विटी, कॉर्पोरेट बाँड्स आणि सरकारी बाँड्स या तीन प्रमुख श्रेणींमध्ये केली जाते. BLC मध्ये, 50 टक्के गुंतवणूक 45 वर्षे वयापर्यंत इक्विटीमध्ये ठेवली जाते. यानंतर, जसजसे ग्राहकांचे वय वाढते, इक्विटीमधील गुंतवणूक हळूहळू कमी होते. वयाच्या 55 व्या वर्षी, इक्विटीमधील गुंतवणूक 35 टक्क्यांपर्यंत खाली येते आणि सरकारी रोख्यांसारख्या सुरक्षित गुंतवणुकीवर अधिक लक्ष दिले जाते.

अधिक पाहा..

Comments are closed.